साने गुरूजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त खान्देशसह महाराष्ट्रात वर्षभर १२५ कार्यक्रम राबविणार

अमळनेर : महाराष्ट्रातील नामवंत बाल साहित्यिक राजीव तांबे इयत्ता ६ वी ते ९ वी तील मुला-मुलींशी गप्पा करायला येणार आहेत. ही सुवर्ण संधी अमळनेर व खान्देशातील विद्यार्थी व मुला मुलींना मिळेल. याच वेळी पालक व शिक्षकांसाठी ‘श्यामची आई’ या नवीन सिनेमातील अभिनेत्री गौरी देशपांडे यांची विशेष मुलाखत असेल.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने साने गुरुजी (१२५) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अश्या विविध क्षेत्रात प्रबोधनाचे १२५ कार्यक्रम विविध घटकांसाठी खान्देशासह महाराष्ट्रात वर्षभर राबविण्यात येणार आहेत. याचे उद्घाटन कुटुंबातील सर्वांना आवडेल. गलवाडे रोडवरील साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या निसर्गरम्य परिसरात रविवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे. कार्यक्रमात कुटुंबातील सर्वांनी सहभागी होऊन साक्षीदार व्हावे असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२१७०२८४१, ९४२१७०२९४२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.