उद्यापासून शिवक्षेत्र खवशी येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहास सुरुवात

अमळनेर : सालाबादाप्रमाणे वै.प.पू. ह.भ.प. विठ्ठल बाबा चौधरी (मोठेबाबा) यांच्या कृपा-आशिर्वादाने तालुक्यातील शिवक्षेत्र खवशी येथील विठ्ठल मंदिराचे प्रांगणात ह.भ.प. भालचंद्र महाराज व ह.भ.प. गणेश महाराज, माऊली भजनी मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे ७२ वे वर्ष आहे. दि.२६ डिसेंबर ते २ जानेवारी २०२४ या काळात दररोज कार्यक्रम सुरु राहतील. सप्ताहभर दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ तेे ११ हरि किर्तन याप्रमाणे कार्यक्रम असतील.

मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी ह.भ.प. उमेश महाराज- दहिवद, बुधवार दिनांक २७ डिसेंबर रोजी ह.भ.प. संतोष महाराज- शेंदुर्णी, गुरुवार दिनांक २८ डिसेंबर रोजी ह.भ.प. संजय महाराज- कासोदा, शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर रोजी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज- वाडीभोकर, शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी ह.भ.प. योगेश महाराज- वाघाडी, रविवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी ह.भ.प. जिवराम महाराज- कापडणे, सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी ह.भ.प. गोविंद महाराज- वरसाडे यांचे किर्तन असेल. मंगळवार दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी ह.भ.प. गोविंद महाराज- वरसाडे यांचे सकाळी ९ ते ११ या वेळात काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. आपल्या शासकीय सेवेतून ३१ डिसेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल गावचे रहिवासी विजय गोविंदराव कापडे व त्यांचा परिवार यांनी महाप्रसादाचे आयोजन केले असून ते महाप्रसादाचे मानकरी आहेत. खवशी ग्रामस्थांनी देखील विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी रोख स्वरुपात सढळ हाताने मदत दिली आहे. पंचक्रोशीतील नांद्री, पातोंडा, अमळगाव, खेडी, जळोद, पिंपळी, गांधली, पिळोदा, रोटवद, दापोरी आदी ठिकाणचे भाविक व भजनी मंडळाचेही सहकार्य लाभणार आहे. समस्त नागरिक, भाविक, सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान, माऊली भजनी मंडळ, शिवशक्ती देवस्थान व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!