अमळनेरात ३ व ४ फेब्रुवारी २४ ला होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या ‘एक मूठ धान्य.. एक रुपया विद्रोही साठी’ अभियानाची सुरुवात

पहिल्याच दिवशी मारवड येथे मिळाला भरभरून प्रतिसाद

अमळनेर : येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे स्वातंत्र्य सेनानी सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी पुतळ्यास अभिवादन करून ‘एक मूठ धान्य.. एक रुपया विद्रोही साठी’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. विद्रोहीच्या मोहिमेस पहिल्याच दिवशी मारवड येथे ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘ या सानेगुरुजी यांचा मानवतावादी संदेश समर्पित आहे. म्हणून अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २४ ला होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात सर्वसामान्य व ग्रामीण भागातील नागरिकांनाही सहभाग देता यावा या उद्देशाने ‘एक मूठ धान्य.. एक रुपया विद्रोही साठी’ या अभियानाची सुरुवात स्वातंत्र्य सेनानी सानेगुरुजी यांच्या पुतळ्यास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी जयवंतराव पाटील, प्रा.अशोक पवार, जयवंत भिमराव पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील, मुन्ना शर्मा, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा.डॉ.लिलाधर पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, दयाराम पाटील, प्रा,डॉ.राहुल निकम, मराठा सेवा संघ अध्यक्ष रामेश्वर भदाणे, आर बी पाटील, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, डी. ए. सोनवणे, प्रसाद शर्मा, योगेश पाटील, आनंदा पाटील, अजिंक्य चिखलोदकर, शुभम पवार, अशोक सुतार, रविंद्र सुकदेव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दानपेटी मध्ये माजी नगरसेवक मुन्ना भाऊ शर्मा, सामाजिक कार्यकर्ते सोमचंद संदानशिव, डी. एम. पाटील यांनी दानपेटीत आर्थिक मदत दिली.

पहिल्याच दिवशी विद्रोही मराठी साहित्य संमेलन समिती मारवड येथे पोहोचली असता, गावकऱ्यांनी “एक मूठ धान्य.. एक रुपया विद्रोहीसाठी” या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभाग घेत विद्रोहीच्या दानपेटीत भरभरून आर्थिक मदत व दोन पोते धान्य जमा झाले. विद्रोही ची गाडी व दानपेटी घेवून यावेळी माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, मराठा समाज अध्यक्ष जयवंतआबा पाटील, हरिभाऊ मारवडकर, जयवंत पाटील, वसंत कन्हेरेकर ,भूषण भदाणे, युवा कार्यकर्ते तुषार संदानशिव, अजिंक्य चिखलोदकर, आदिंसह कार्यकर्ते गावात फेरी काढून माहिती पत्रक वाटत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी दानपेटीत आर्थिक मदत देत उपस्थिती दिली. मोहिमेत गणेश साळुंखे, अतुल साळुंखे, दिलीप चव्हाण, सचिन साळुंखे, शामकांत पाटील, चंद्रकांत साळुंखे आदीं सहभागी झाले होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!