स्पर्धेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थान चे प्रायोजकत्व
अमळनेर : येथील व्हाईस ऑफ मिडिया व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.५ जानेवारीला ‘कै. बाळशास्त्री जांभेकर खुली मॅरेथॉन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सकाळी नऊ वाजता महाराणा प्रताप चौक येथून सुरुवात होईल. स्पर्धेत प्रथम आलेल्या खेळाडूला पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय आलेल्या स्पर्धकाला तीन हजार रुपये रोख व प्रमाणपत्र तर तृतीय आलेल्या खेळाडूला हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
विजयी स्पर्धकांना शनिवारी (दि.६) रोजी पत्रकार दिनी सकाळी १० वाजता येथील विश्राम गृहाजवळ होणाऱ्या समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थान ने प्रायोजकत्व स्विकारले आहे. ही स्पर्धा १५ वर्षाच्या पुढील युवक व पुरुषांसाठी आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रकारचे शुल्क नसून जास्तीत जास्त युवक यांनी सहभागी व्हावे. स्पर्धकांनी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सोबत आणावे. स्पर्धकांनी आपल्या स्वतःच्या जोखमीवर स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. स्पर्धेदरम्यान कोणालाही दुखापत, ईजा किंवा अपघात झाल्यास त्याला आयोजक जबाबदार राहणार नाहीत. असभ्य व बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल. नाव नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान होईल. खुल्या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात महाराणा प्रताप चौक येथून होणार असून धुळे रस्त्यावरील नूतन प्रवेशद्वार तसेच परत त्याच मार्गाने महाराणा प्रताप चौकात समारोप होणार आहे. नाव नोंदणी साठी जयंतलाल वानखेडे (८६६८८३०४७२), समाधान मैराळे (७७९६११२८९४), बापूराव ठाकरे (९९६०२०९८२५) व उमेश काटे (९४२३५७९८२७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन व्हाईस ऑफ मीडिया व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.