स्त्री आत्मसन्मानाची जनक सावित्रीबाई फुले : शिवानी वाघ
अमळनेर : भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या स्त्री शिक्षिका प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, दलितांच्या कैवारी, समता चळवळीच्या प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या आघ प्रणेत्या, अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक म्हणजेच कृतीशील समाजसेविका सावित्रीबाई जोतीराव फुले. त्या स्त्री आत्मसन्मानाच्या जनक होत्या असे बार्टी संस्थेच्या समन्वयक शिवानी वाघ यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये अध्यक्षीय भाषण करताना त्या म्हणाल्या. व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी, अरविंद सोनटक्के, भाऊसाहेब एन.जी देशमुख होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तर निबंध स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हिंदी दिनानिमित्त दि. १४ सप्टेंबर रोजी शाळेत सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेतील १० गुणवंत विद्यार्थ्यांना कै. सागर नगावकर (कुलकर्णी) यांच्या स्मरणार्थ उज्वला नगांवकर व साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर यांच्या सौजन्याने स्मृतीचिन्ह देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे…
वकृत्व स्पर्धा : प्रथम – सोनाली पाटील (इयत्ता नववी), द्वितीय – गायत्री भिल (दहावी), तृतीय – क्रिश पाटील (इयत्ता आठवी), चतुर्थ – रागिणी पाटील (इयत्ता नववी), उत्तेजनार्थ : श्वेता बैसाने, वैष्णवी माळी ,जयश्री पाटील ( इयत्ता दहावी)
शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचा असामान्य त्याग, कार्याप्रती असीम निष्ठा, अखंड परिश्रम, अतुलनीय धाडस, आणि अविचल मूल्यांची जपणूक करणाऱ्या सावित्रीबाई स्त्री जातीस व समस्त मानवजातीस एक प्रेरणादायी व वंदनीय व्यक्तीमत्व आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ईश्वर महाजन यांनी केले. वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून एच.ओ.माळी, अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले. आभार प्रदर्शन एस. के. महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले.