मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने झालेल्या खुली मॅरेथॉन स्पर्धेत जयेश पाटील प्रथम, सुनील बारेला द्वितीय तर दिनेश वसावे तृतीय क्रमांकाचे मानकरी

अमळनेर : पत्रकार या नात्याने आपण समाजाला उपयोगी ठरणारे कार्य करीत आहात. ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा तसेच विविधांगी उपक्रमात नावलौकिक मिळविणाऱ्यांचा सन्मान करून इतरांना प्रेरित करण्याचे मोठे सामाजिक कार्य दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी करीत आहात ही बाब उल्लेखनीय आहे. पत्रकार बांधव लेखणीतून नेहमीच प्रसिद्धी देत असतात. पत्रकारितेतून काही चुका झाल्यास लक्षातही आणून देत असतात. त्यामुळे पत्रकार म्हणून कार्याची दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी पत्रकार दिनी आयोजित कार्यक्रमात केले.
अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकातील विश्रामगृहाचे आवारात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे ६ जानेवारीला आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन प्राध्यापक अशोक पवार, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले, पाडळसरे धरण समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सुषमाताई देसले, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज पाटील, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, प्राध्यापक सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जयवंत वानखेडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष अजय भामरे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा विशेष कामगिरी करणाऱ्यांचाही सत्कार नामदार अनिल पाटील यांचे हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी दिवंगत पत्रकार राजेंद्र पोतदार व राजेंद्र सुतार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हॉइस ऑफ मीडिया अमळनेर तर्फे दिनांक ५ जानेवारी रोजी खुली मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात जळगावचा जयेश पाटील प्रथम, चोपड्याचा सुनील बारेला द्वितीय तर धडगावचा दिनेश वसावे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. या तिघांना मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर, जगन्नाथ बडगुजर यांचाही सन्मान करण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डिगंबर महाले, जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल जयेशकुमार काटे, जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल उमेश धनराळे, निबंध स्पर्धेतील यशाबद्दल ईश्वर महाजन, राष्ट्रीय पॅरा पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेतील यशाबद्दल दिनेश बागडे व प्रशिक्षक किशोर महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी न. प. चे निवृत्त प्रशासनाधिकारी भाऊसाहेब देशमुख, प्रताप महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. बी. जैन, न. प. चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता दिगंबर वाघ, हरी भिका वाणी, माजी नगरसेवक प्रताप साळी, माजी नगरसेवक श्याम पाटील, प्राचार्य प्रकाश महाजन, माजी केंद्रप्रमुख चंदू वानखेडे, सभापती अशोक पाटील, हेमंत कुमार भांडारकर, सुनील वाघ, मकसद बोहरी, विजय शुक्ल, शिवसेनेचे विजय पाटील, महेश पाटील, पंडीत चौधरी, गोपनीय शाखेचे शरद पाटील, प्रा. लिलाधर पाटील, रणजीत शिंदे, राष्ट्रवादीचे मुक्तार खाटीक, इम्रान खाटीक, सोमचंद संदानशिव, बाळू पवार, माजी नगरसेवक संजय भिला पाटील, हैबत पाटील, पंकज मुंदडा, पंकज चौधरी, परिश्रम दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष योगेश महाजन, मुख्याध्यापक मनिष जाधव, योगराज संदानशिव, प्रताप शिंपी, सोपान भवरे, मनोज शिंगाणे, सन्मान फाउंडेशनचे नितीन वानखेडे, सुनीता वानखेडे तसेच विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पत्रकार बांधवांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले तर आभार डिगंबर महाले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह सेवेकरी व दोन्ही संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.