आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी (शिंदे) यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हिरवा झेंडा दाखवून केले स्पर्धेचे उद्घाटन

अमळनेर : शरीराची हालचाल होणं हा महत्वाचा भाग आहे. यामुळे स्वास्थ्य उत्तम राहते. प्रत्येकाने स्वतःला दररोज किमान अर्धा एक तास शिस्त लाऊन घ्यावी. पुढील वर्षी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत आता पेक्षा पाच पटीने मुली व महिला सहभागी दिसतील अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी (शिंदे) यांनी व्यक्त केली. देशातील क्रमांक १ ची पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मिडिया व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) चे औचित्य साधत नुकतीच १५ वर्षावरील मुली व महिलांसाठी महाराणा प्रताप चौक ते कलागुरू मंगल कार्यालय व तेथून परत महाराणा प्रताप चौक अशी तीन किलोमीटर अंतराची नि:शुल्क खुली मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंगळ्ग्रह सेवा संस्था, अमळनेर स्पर्धेचे प्रायोजक होते. आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी (शिंदे) कार्यक्रमाचे उद्घाटक होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, ॲड. ललिता पाटील, तिलोत्तमा पाटील, प्रा. रंजना देशमुख, अपर्णा मुठे, आदित्य भारद्वाज, आनंद पवार, वैशाली पाटील, दिपीका सोनवणे, गीतांजली घोरपडे, योगिता गुजर, शितल देशमुख, पूनम पाटील आदींसह मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा व्हाईस ऑफ मीडिया चे डिगंबर महाले म्हणाले की, पुढील वर्षी क्रांती ताईंच्या मार्गदर्शनाने व महिला मंचच्या माध्यमातून यापेक्षा अधिक मोठ्या स्वरुपात महाराष्ट्रातील मेगा मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा मानस आहे. यासाठी सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रीय पंच क्रीडाशिक्षक मिलिंद पाटील यांनी स्पर्धकांना मार्गदर्शक सूचना व स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी (शिंदे) यांनीही सहभाग नोंदवून स्वतः धावत स्पर्धकांना प्रेरित केले. उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी काही पावले अंतर धावून स्पर्धेला सुरुवात केली. यानंतर आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी (शिंदे) यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस व सन्मानपत्र देण्यात आले. सोबतच सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेतील विजेते स्पर्धक…
प्रथम : कु. जान्हवी संजय रोझोदे (जळगाव) – ५००० रुपये
द्वितीय : कु. आश्विनी नामदेव काटोले – ३००० रुपये
तृतीय : कु. आश्विनी सुनील मोरे – १००० रुपये.
स्पर्धेतील एकंदरीत प्रतिसाद पाहता ऐनवेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी आणखी दोन बक्षीसे वाढवून दातृत्व दाखवून दिले.
चतुर्थ ( अमळनेर शहर) : कु. ज्योती बापू महाजन – ७०० रुपये
पाचवे (ग्रामीण गडखांब) : कु. मंजुषा संतोष पाटील – ५०० रुपये

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले तर डिगंबर महाले यांनी आभार मानले. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थिनी व महिलांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यात डी. आर. कन्या शाळेतील विद्यार्थीनींचा मोठा सहभाग होता. स्पर्धकांसाठी थंड पाणी, चहा, शक्तिवर्धक गोळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धे दरम्यान अमळनेर पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद कर्मचारी लक्ष ठेवून होते. रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी झाली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.