ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे ‘कला दर्पण’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

राजा शिवछत्रपती आणि स्वामी विवेकानंद यांच्यावरील सजीव नाट्यप्रयोग ठरले स्नेहसंमेलनाचे आकर्षण

अमळनेर : येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल (CBSE) येथे शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी रोजी ‘कला दर्पण’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. ललिता पाटील होत्या. सोबत व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक अशोक पाटील, सौ. कमल पाटील, दिनेश पाटील, पराग पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, सर्व निमंत्रित प्राचार्य, प्रा. प्रकाश महाजन, उपप्रचार्य अश्विनी चौधरी, वरिष्ठ पर्यवेक्षिका जयश्री भोसले यांनी दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना आणि शिवतांडव नृत्य सादरीकरणाने कार्यक्रम सुरु झाला. प्राचार्य नीरज चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शाळेचा गेली १० वर्षांचा आढावा सादर केला. संस्थेवर पालकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणातून ॲड. ललिता पाटील यांनी शाळा उभारणी करताना आलेले खडतर अनुभव कथन केले. सर्वांना आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. कार्यक्रमात दहावी व बारावी सीबीएसई परिक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. शाळेत १० वर्षांहून अधिक कार्यकाळ झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या रंगारंग नृत्याने उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले. राजा शिवछत्रपती आणि स्वामी विवेकानंद यांच्यावरील सजीव नाट्यप्रयोग हे स्नेहसंमेलनाचे आकर्षण ठरले. नर्सरी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, राजस्थानी घूमर, गुजराथी गरबा, काश्मिरी नृत्य, मराठी लावणी, जोगवा, मात्र पितृ देवो भव संदेश आदी सर्व भारतीय संस्कृतीला अनुसरून असलेले नृत्याविष्कार सादर केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महिला शिक्षिकांनी जिजाऊंचा जीवनपट सादर करत मानवंदना दिली. एका पेक्षा एक सरस नृत्य व नाटिकांच्या मेजवानी चा विद्यार्थी, पालक व प्रेक्षकांनी आनंद घेतला. त्यास भरभरुन दाद मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विलास पाटील, मुस्कान ढिंगराई व सोबत विद्यार्थ्यांपैकी गायत्री, लुईजा, मृणाल, संजीवनी, हर्षदा, प्रियांशी यांनी देखील केले. आभारप्रदर्शन शिक्षक केदार देशमुख व निलेश वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या डिजिटल ब्रॉडकास्टिंग संगणक विभागाचे शिक्षक अतुल भदाणे अनुश्री जोशी, ऋतुजा जोशी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!