सु.हि.मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे वरीष्ठ लिपीक संजय हिंमतराव साळुंखे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचे वरीष्ठ लिपीक संजय हिंमतराव साळुंखे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी एकूण ३३ वर्षे १ महिना प्रामाणिकपणे सेवा केली. ओबीसी शिक्षक असोसिएशन व मराठी लाईव्ह न्युज नेटवर्कच्या वतीने त्यांना सपत्निक सन्मानपत्र, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार तथा ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष व मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अध्यापक मंडळाचे खजिनदार तथा साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे मा. उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे मा.तालुकाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी उपस्थित होते. आपण केलेला सत्कार मला भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी असून मी आपल्या ऋणात राहील असे भाऊसाहेब संजय साळुंखे यांनी सत्कार प्रसंगी सांगितले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!