
जळगाव : प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील डॉ. वंदना भामरे यांना प्रतिष्ठेचा बी.एन. वाफारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांना हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. पी. के. त्रिविक्रम यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला. सन्मानपत्र आणि रोख रु. २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. वंदना भामरे आणि एसएसव्हीपीएस सायन्स कॉलेज धुळे येथील गणित विषयातील प्रा. डॉ. एम. एम. पवार यांना २०२३ वर्षात ८९ व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात बी. एन. वाफारे पुरस्कार जाहीर झाला होता. बीआयटीएस पिलानी, हैदराबाद कॅम्पस येथील मॅथेमॅटिकल सोसायटीने “कव्हरिंग एनर्जी ऑफ पोसेट अँड इट्स बाउंड, मॅथेमॅटिका बोहेमिकामध्ये प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट शोधनिबंधासाठी हा पुरस्कार देण्यात आला. प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन आणि सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.