माजी आमदार स्मिता वाघ यांचे हस्ते माझा प्रभाग पतंग महोत्सवाचे झाले उद्घाटन; तरुणाई डीजे च्या तालावर थिरकली

अमळनेर : सालाबादाप्रमाणे येथील श्रीकृष्णपुरा, वड चौक, सावतावाडी, शारदा कॉलनी, श्रीराम कॉलनी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिक, बाळ गोपाळ व महिला मंडळींसाठी खास मकर संक्रांती निमीत्ताने माजी नगरसेवक विक्रांत पाटील व सौ. स्वप्ना पाटील यांनी माझा प्रभाग पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ यांचे हस्ते फुगे व पतंग हवेत सोडून पतंग महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. श्री संत सखाराम महाराज यांच्या शेतातील शारदा कॉलनी व वाडीतील मैदानात पतंग महोत्सव भरविण्यात आला होता. उपस्थित सर्वांना मोफत पतंग वाटप करण्यात आले. सर्वाँनी उत्साहपुर्ण वातावरणात पतंग उडवून डी. जे. च्या तालावर नाचत आनंद द्विगुणित केला.

याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. माधुरी पाटील, बाजार समितीच्या माजी प्रशासक सौ. तिलोत्तमा पाटील, उद्योगपती सौ. लीना पाटील, सौ. रंजना महाजन, कविता मराठे, शितल सोनार, वैशाली कुलकर्णी, नलिनी बारी, प्रतिभा बारी, राजसबाई भोई, वर्षा पाटील, जयमाला धनगर, प्रतिभा पगारे, सौ. नलिनी ईश्वर पाटील, विद्या पाटील यांचेसह रणजित पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, कैलास पाटील, प्रमोद सोनार, अरुण पाटील, शरद पाटील, श्याम साळी, बाळू पाटील, मुकेश ठाकूर, प्रवीण ठाकुर, गणेश सोनवणे, शिवम पवार, गणेश बारी, भुषण महाजन, पंकज वाघ, भैय्या पाटील, बंटी पाटील, भटू सैंदाणे, जगदीश सोनार, अशोक पाटील, सागर शेटे, दिनेश शेटे, कमलेश बोरसे, राजेश परदेशी, राकेश शेटे, नितेश चव्हाण, हितेश बारी, जयेश बडगुजर, समाधान पाटील, समाधान नाथबुवा, निरज पाटकरी यांचेसह बालगोपाळ, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश महाजन यांनी केले तर कार्यक्रमातील सर्व उपस्थितांचे आभार सौ. स्वप्ना पाटील यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!