विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कला प्रकारांतून विद्रोह ; विविध प्रदर्शनांची रेलचेल एक वेगळं आकर्षण ठरेल

अमळनेर : येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनात कलाप्रकारांतून विद्रोह मांडणारे स्वतंत्र जगविख्यात चित्रकार केकी मूस कला दालन लक्षवेधी ठरणार आहे. शिल्प, चित्र, कॅलिग्राफी , स्केच, फलक लेखन, रेखाटन यासारख्या आधुनिक कला प्रकारांचे थेट सादरीकरणासह, वैशिष्ठ्यपूर्ण आदिवासी संस्कृती प्रदर्शनांसह, जागतिक किर्तीचे कलाकारांचे सामाजिक विषयांवरील अनेक चित्र प्रदर्शनं आकर्षण ठरणार आहेत. विद्रोही मराठी साहित्य संमेलनात जगविख्यात चित्रकार केकी मुस कला दालन स्वतंत्रपणे उभारण्यात आलेले आहे. या कला दालनात केकी मूस यांनी काढलेले अस्सल पोर्ट्रेट प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरेल. तर जागतिक किर्तीचे राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नावाजलेले व विविध पुरस्कार प्राप्त कलावंतांचे दृश्य कला दालन लक्षवेधी ठरणार आहेत. यात विशेष प्रदर्शनं पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

विशेष प्रदर्शनांत जागतिक किर्तीचे वैदर्भिय कला अकादमी नागपूरचे छायाचित्रकार नानू नेवरे यांचे शेतकरी आत्महत्या संदर्भातील माझा शेतकरी चित्र प्रदर्शन, औरंगाबाद येथील चित्रकार राजानंद सुरडकर यांचे कवितेंवर आधारित चित्रकाव्य प्रदर्शन, जळगांवच्या प्रकाशक लेखक गौतम निकम यांचे खान्देशातील आंबेडकर चळवळ यावरील पोस्टर प्रदर्शन, दैनिक ‘व्यंगचित्र’चे संपादक राजेंद्र सोनार यांचे व्यंगचित्र प्रदर्शन, मंगळूरपीर येथील व्यंगचित्रकार गणेश वानखेडे यांचे गाजलेले व्यंगचित्र प्रदर्शन यासह धुळे येथील डॉ. पापलाल पवार यांच्या ‘खानदेशचे जननायक’ या पुस्तकावर आधारित कवी चित्रकार राम जाधव यांचे पोस्टर प्रदर्शन लक्षवेधी ठरणार आहे.

विविध कलाप्रकराचे थेट सादरीकरण ठरणार आकर्षण

१८ वे विद्रोही साहित्य संमेलन, अमळनेर येथे दृक कला मंच द्वारा चित्र, शिल्प व कॅलिग्राफी, कलात्मक फलक लेखन या माध्यमातून लाईव्ह कला प्रदर्शन करण्यासाठी खान्देश सह राज्यभरातून सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार येणार आहेत.यात पुणे येथिल प्रसिद्ध चित्रकार व साहित्यिक राजू बाविस्कर, चोपडा येथिल चित्रकार, मुंबई फिल्म इंडस्ट्री, आर्टिस्ट हुकूमचंद चव्हाण, लेखक,चित्रकार प्राचार्य राजेंद्र महाजन,खिरोदा येथील शिल्पकार, चित्रकार प्राचार्य अतुल मालखेडे, जळगाव सुप्रसिद्ध चित्रकार श्याम कुमावत, जळगाव शिल्पकार प्रा निरंजन शेलार, शिरपूर सुप्रसिद्ध फलक रेखाटनकार प्राचार्य प्रल्हाद सोनार, शहादा येथील चित्रकार व फलक रेखाटनकार चतुर्भुज शिंदे, जळगाव चे चित्रकार व साहित्यिक हरून पटेल, चोपडा येथिल कॅलिग्राफी, चित्रकार पंकज नागपुरे व वसंत नागपुरे, जळगाव शिल्पकार रविंद्र चौधरी, अमळनेरचे शीघ्र रेखाटनकार, चित्रकार आर.एन.पाटील, आदी मान्यवर कलाकारांसह चित्र प्रदर्शनात वरसाडे तांडा परशुराम पवार, पारोळा श्याम अहिरे, पारोळा येथील आर.एन.पवार, अमळनेरचे विलास शेलार, शहादाचे नितीन पाटील, नगरदेवळाचे निलेश शिंपी,चोपडा चे जितेंद्र साळुंखे, दोंडाईचा येथील लक्ष्मीकांत सोनवणे, धरणगाव येथील के.आर.महाजन, सुनील तायडे आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!