
अमळनेर : समाजातील प्रश्न हे अस्वस्थ करतात आणि त्याबाबत सखोल मंथन तसेच आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थिती बाबतचे लिखाण सर्जक पुस्तकात अधोरेखित केले आहे. असे मत किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी शहरातील युवक मयुर बाळकृष्ण बागुल यांचे सर्जक लेख संग्रह पुस्तकाचे प्रकाशनावेळी व्यक्त केले. अमळनेर येथील ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळी माता पित्याच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत, लेखक, साहित्यिक संदीप वाकचौरे, शिक्षण तज्ज्ञ लेखक जे. डी. पराडकर, चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, विवेक मासिकाचे संपादक रविंद्र गोळे, प्रफुल्ल प्रकाशन चे संचालक तथा पत्रकार संजय सूर्यवंशी, पत्रकार ईश्वर महाजन आदी उपस्थित होते.
सर्जक लेख संग्रह हा अमळनेर येथे साने गुरुजींच्या कर्मभूमी मध्ये प्रकाशित होणे हे मयुर बागुल यांचे भाग्य आहे. सर्जक पुस्तक हे विविध अंगांनी समाजामधील प्रश्न आणि त्याबाबत चिंतनपर लेखन हे आजच्या पिढीतील युवक लिहीत आहे हे होणे आजची गरज आहे. पुस्तकातील लेखक सर्वांगणे विचार करून त्याबाबत चिंतन करणारे आहे असे मत संदीप वाकचौरे यांनी मांडले. सर्जक हे पुस्तक विविध सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यावर सतत लिखाण करणे हे आजचा युवक असे विचार आजचा युवक समाजासमोर मांडतो हे खुप महत्त्वाचे असल्याचे जे. डी. पराडकर यांनी सांगितले. चपराक प्रकाशन, पुणे सारख्या नामवंत संस्थेने हे पुस्तक प्रकाशित करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून बाळकृष्ण बागुल, मयुर बागुल यांनी चपराक प्रकाशन परिवाराचे आभार मानले. पुस्तक प्रकाशनासाठी सासू, सासरे व कुटुंबातील सर्व सदस्य, मित्र परिवार उपस्थित होते.