
अमळनेर : येथील शासकीय रुग्णालयाचे वतीने येथे सुरु असलेल्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन दिवस येणाऱ्या सर्व साहित्यप्रेमींना आरोग्य सेवा म्हणून औषध उपचार व आरोग्य तपासणी तसेच आयसीटीसी विभाग अंतर्गत एचआयव्ही संदर्भात मार्गदर्शन व माहिती पुस्तिका वाटण्यात आल्या. यासाठी ग्रामीण रुग्णालय अमळनेरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रांजली पाटील,
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश ताळे, डॉक्टर जी. एम. पाटील, डॉक्टर संदीप जोशी, डॉक्टर सुमित पाटील, डॉक्टर परेश पवार, माजी एक्स-रे टेक्निशियन भगवान काळे, समुपदेशक अश्वमेध पाटील, दीपक शेलार, जयेश मोरे, क्षयरोग विभागाचे रमाकांत सैंदाणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे, अधिपरिचारक बिपीन सपताळ, कश सेवक निलेश भुरट, रुग्णवाहिका वाहन चालक मनोहर पाटील, आरोग्य सेवक उल्हास माकडे यांचे विशेष सहकार्य लाभले.