विविध देखाव्यांसह विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सांस्कृतिक विचारांची दिंडी

अमळनेरसह उपस्थित प्रेक्षक, रसिकांची रस्त्यावर दुतर्फा गर्दी

अमळनेर : येथे १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनास काल दिनांक २ फेब्रुवारी रोजी जल्लोषपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ, सावित्रीच्या लेकी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेशभूषाधारी नागरिक, आदिवासी संस्कृतीसह विविध सांस्कृतिक देखावे, विद्रोही तोफ सह धुळे रस्त्यावरील निघालेली दिंडी लक्षवेधी ठरली. संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे उद्घाटन केले. अमळनेर शहरातील महात्मा बळीराजा स्मारकापासून झाली. प्रांत बंगला, मार्केट, सुनंदा पार्क, धुळे रोड मार्गे सांस्कृतिक विचार दिंडी विद्रोही साहित्य संमेलनाच्या मुख्य द्वारा जवळ आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटनानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत विचार यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील, राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, संयोजक करीम सालार, लीना राम पवार, अविनाश पाटील- धुळे, प्रशांत निकम, बापूराव ठाकरे यांचे सह संयोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर सांस्कृतिक वैचारिक यात्रेत उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यस्थापक सीमा रगडे, ज्योती भावसार यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी जिजाऊ, सावित्री वेशभूषेसह विशेष सहभाग नोंदवला. अमळनेर मधील सरस्वती विद्या मंदिर, शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी विद्यामंदिर, उर्दू कन्या शाळा, पंडित नेहरू समाज कार्य महाविद्यालय सोबतच अमळनेरकर हजारों रसिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. या विचार यात्रेत चित्ररथावरील संविधान व सहभागी महामानवांचे वेशभूषाधारी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले वेशातील बापूराव ठाकरे व सौ. पुनम ठाकरे यांचेसह गाडगे बाबांची वेशभूषा केलेले यशवंत बागुल फुलचंद नाग टिळक, घोड्यावरील बाल शिवबा, राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या बालिका मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले. तर मेघा पाटील व विद्यार्थी यांचे उत्कृष्ट लेझीम पथक, वैशाली पाटील व विद्यार्थी विद्यार्थीनी यांचे काठी पथक,अनिता संदानशिव व सहकारी महिलांचे रमाई ढोलपथक, आर्मी जीप, संबळ नृत्य, नंदीबैल नृत्य, डोंगर नृत्य असे आदिवासी संस्कृतीचे नृत्य मनोवेधक होते. जोगवा,भजन मंडळ, वारकरी पथक, शशांक संदानशिव यांचा मोहिनी बँड सह दहिवद गावाच्या वृक्ष लागवडीच्या मनरेगाच्या महिला भगिनींनी देवानंद बहारे, उपसरपंच शिवाजी पारधी ,सदस्य वैशालीताई गोसावी, योगिता गोसावी यांचेसह उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सांस्कृतिक विचार यात्रा यशस्वी करण्यासाठी या दिंडीचे व्यवस्थापन आरती पाटील, वैशाली शेवाळे, प्राचार्य डॉ. पी एस. पाटील व विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!