जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदकाची मानकरी

अमळनेर : गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्ह्यातील निकाल नुकताच जाहीर झाला. गांधी विचार संस्कार परीक्षेत कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील कु. नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
तालुक्यातील गोवर्धन येथे सुरु असलेल्या महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात अमळनेर विभागाचे डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम करून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त करावे,असे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी केले. यावेळी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील, संस्थेचे सेक्रेटरी देविदास बारकू पाटील, सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले व सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी कु. नाजमीन पठाण चे कौतुक केले.