उमेश काटे यांना महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर

धुळे येथे रविवारी होणार पुरस्काराचे वितरण

अमळनेर : येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक तथा पत्रकार उमेश प्रतापराव काटे यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. धुळे येथील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात रविवारी (ता.११ फेब्रुवारी) सकाळी ११.३० वाजता पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यावेळी भव्य शिक्षण परिषदही आयोजित करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून माजी खासदार तथा राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत अध्यक्षस्थानी राहतील. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री जयकुमार रावल, पोलीस उपाधीक्षक एल. एन. कानडे (नाशिक) आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान नांदेड जिल्हा पुरस्कार निवड समितीने उमेश काटे यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाबद्दल तसेच स्पर्धा परीक्षेतील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रा. श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, प्राचार्य गायत्री भदाणे, मुख्य कोषाध्यक्ष गजेंद्र कानडे, जिल्हा सचिव अभय नंदन (संभाजीनगर) आदींनी अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!