मारवड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप

अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे गोवर्धन येथे आयोजित करण्यात आले होते. सोमवार दि. 12 रोजी सकाळी राष्ट्रीय सेवा योजनेचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे महादेव खेडकर (प्रांताधिकारी उपविभागीय अधिकारी अमळनेर) आणि रुपेश कुमार सुराणा (तहसीलदार अमळनेर) यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचा समारोप झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देविदास बारकू पाटील (सेक्रेटरी ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड) हे होते. याप्रसंगी जयवंतराव मन्साराम पाटील (अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड ) संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक युवराज काशिनाथ पाटील, महारू रामदास शिसोदे, सुरेश भिमराव शिंदे, चंद्रकांत रामराव शिसोदे, राजेंद्र फकीरा पाटील, तसेच सर्व संचालक मंडळ आणि शांताराम शामराव पाटील, डॉ.प्रशांत दिलीपराव शिंदे, पंकज युवराज निकम (लोकनियुक्त सरपंच गोवर्धन बोरगाव ग्रामपंचायत), नरेंद्र शांताराम पाटील, अनिल निंबा पाटील (पंचायत समिती अमळनेर) उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.दिलीप कदम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात N S S गीताने विद्यार्थ्यांनी केली. श्री. महादेव खेडकर प्रांताधिकारी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा योग्य वापर करावा, आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, स्पर्धेचे युग आहे. तरी अभ्यासात अधिक लक्ष घालावे. असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीच मनोगत व्यक्त केले, यात नियोजित प्रकल्प सक्षम युवा समर्थ भारत मतदान जनजागृती, अभियान शाश्वत विकासात युवकांचे योगदान व शाश्वत ग्रामविकास, पंचप्राण, युवा संवाद, स्वच्छ भारत अभियान, विशेष मोहीम, शिक्षण अंतर्गत पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, माजी वसुंधरा अभिमान, ऊर्जा बचत काळाची गरज, इंडिया सक्षम भारत निर्माण करणे, इत्यादी असल्याने यासंदर्भात आकाश पाटोळे, पूनम भिल, कल्याणी पाटील, निकिता वाघ, संजय सोनवणे, शुभम पाटील या विद्यार्थ्यांनी शिबिराचे संदर्भात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने केले तर आभार कोमल पाटील या विद्यार्थिनींने मानले. सदर N S S शिबिरास सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!