उपक्रमशील शिक्षक रंगराव पवार महात्मा ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अमळनेर : तालुक्यातील लोंढवे हायस्कूल चे उपक्रमशील शिक्षक आर. पी. पवार यांना लुंकड कन्या शाळा, जळगाव शाळेत दिनांक ११ फेब्रुवारी रोजी राज्य समता शिक्षक परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महात्मा ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक आमदार किशोर दराडे व मॅक्स महाराष्ट्र मराठी चॅनलचे किरण सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षकांची निवड केली जाते. अगदी पारदर्शकपणे शिक्षकाला त्याच्या कामाची उत्तम पावती म्हणून हा पुरस्कार दरवर्षी उपक्रमशील शिक्षकांना दिला जातो.

आर. पी. पवार हे एक उपक्रमशील शिक्षक असून आपल्या शाळेत त्यांनी कोणतेही काम प्रामाणिक, तत्पर व आपला अमूल्य वेळ देऊन केलेले आहे. शाळेचे हित व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते तत्पर असतात. विविध उपक्रमांत आपल्या शाळेतील विद्यार्थी सहभागी करून त्यांना तालुका ते जिल्हा स्तरावर आणण्याचे नाविन्यपूर्ण काम त्यांनी केले आहे. साने गुरुजींच्या चालत असलेल्या राष्ट्रसेवा दल चळवळीत ते सक्रिय असतात. अगदी शांत संयमी, प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. पुस्तके वाचनाचा त्यांना छंद असून प्रसिद्धीची हाव नाही. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य समता परिषद राज्याध्यक्ष भरत शिरसाठ जिल्हा सहसचिव एस . एच .भवरे, समता परिषद प्राथमिक जिल्हाध्यक्ष अजय भामरे तसेच समता परिषद तालुका अमळनेर चे अध्यक्ष सर्जेराव शिसोदे त्याचप्रमाणे समता परिषद अमळनेर प्राथमिक विभाग अध्यक्ष बापूराव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. अमळनेर तालुक्यातील विविध शिक्षक संघटना तसेच लोंढवे हायस्कूलचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी त्यांचे कौतुक केले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!