धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) शिबीर संपन्न

अमळनेर : धनदाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ काळात अमळनेर तालुक्यातील मौजे आटाळे येथे झाले. शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक अनिल बाविस्कर यांच्या हस्ते ९ फेब्रुवारीला झाले. या शिबिरात एकूण ७५ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सात दिवसाच्या कालावधीत विद्यार्थी हे आटाळे गावातील जिल्हा परिषद शाळेत निवासी होते. विद्यार्थ्यासोबत प्रा. महादेव तोंडे (कार्यक्रमाधिकारी), डॉ. संगीता चंद्राकर (महिला कार्यक्रमाधिकारी), व उपप्राचार्य डॉ. लिलाधर पाटील (सहाय्यक कार्यक्रमाधिकारी) यांनी काम केले. या कालावधीत विद्यार्थ्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली. त्यात आटाळे गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची स्वच्छता करुन झाडांना आळे करणे, झाडांना पाणी टाकणे, नवीन झाडे लावण्यासाठी ५० खड्डे खोदणे, गावातील सर्व रस्ते झाडून स्वच्छ करणे, नाल्या साफ करणे आणि गावातील हनुमान मंदिर, महादेव मंदिराची स्वच्छता करणे आदी कामे केली. गावात जनजागृती रॅली काढत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यातून पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव याविषयी जनजागृती करण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले.

शिबिराचा समारोप दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला. समारोप प्रसंगी डॉ.सचिन नांद्रे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कबचौ. उमवि. जळगाव), डॉ.दिलीप गिरे ( विभागीय समन्वयक कबचौ. उमवि. जळगाव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून के. डी.पाटील (चेअरमन, धनदाई महाविद्यालय विकास समिती) होते. याप्रसंगी धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. महादेव तोंडे, उपप्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, डॉक्टर संगीता चंद्राकर, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच आटाळे गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!