
अमळनेर : देश पातळीवरील नंबर- १ ची ,ISO नामांकन संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या ‘व्हाईस ऑफ मिडिया’ तर्फे मुंबई येथील मंत्रालयासमोरच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काल दि.२६ फेब्रुवारी रोजी संघटनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांसाठी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अमळनेर येथील साप्ताहिक लेखन मंच चे कार्य. संपादक तथा व्हाईस ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल युवा सेना अध्यक्ष तथा आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांचे हस्ते “राज्य उत्कृष्ट तालुकाध्यक्ष अवार्ड -२०२३ ” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष लढ्ढा होते. याप्रसंगी मंगलप्रभात लोढा, (मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता, महाराष्ट्र राज्य), माजी मंत्री यशोमती ठाकूर, विचारवंत डॉ.नामदेव भोसले आदी उपस्थित होते.
व्हाईस ऑफ मिडिया ,अमळनेर शाखेने विविध लोकोपयोगी, समाज उपयोगी उपक्रम राबविले होते. या कामाची पावती म्हणून, तसेच व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रातील आणखी काही पत्रकारांना यावेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मा.संदीपजी काळे, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, व्हाईस ऑफ मीडिया, प्रदेशाध्यक्ष अनिल जी मस्के, महासचिव दिव्याताई भोसले तसेच कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन..!