पाटबंधारे विभागातील विजय कापडे यांच्या सेवा पूर्ती निमित्त सन्मान सोहळा संपन्न

मी माझा बाप कमावला.. तीच माझी खरी संपत्ती : सुमित कापडे

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथे येथील विजय गोविंदराव कापडे पाटबंधारे विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ काल इंदिराभवन येथील हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. विजय कापडे यांनी पाटबंधारे विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून सुमारे ३३ वर्षे सेवा केली आहे. सेवा करीत असतांनाच आपल्या पित्यावर ओढवलेल्या प्रसंगाची आठवण म्हणून तीनही मुलांनी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास व्यासपीठावर परमपूज्य सात्विक मुनी बिडकर बाबा (रणाईचे), पाटबंधारे विभागाचे अभियंता व्ही. एस. पाटील, ग्रामविस्तार अधिकारी सुनिल पाटील, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, सत्कारमूर्ती विजय कापडे व सौ. विजया कापडे आदी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना विजय कापडे म्हणाले की, नोकरी करीत असताना उस्मानाबाद, नवापूर, धुळे, चोपडा असा प्रवास केला. सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले व प्रेम दिले. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोरोना काळात अत्यंत बिकट परिस्थिती असताना जेव्हा मला कोरोनाने गाठले तो प्रसंग माझ्या मोठ्या मुलाला जास्त माहीत आहे. त्याने माझ्या सेवेसाठी स्वतःवर कोरोना ओढवून घेतला मात्र न घाबरता त्याची जबाबदारी पार पाडली. आजचा हा दिवस मी पाहिला असता की नाही हे सांगू शकत नाही. परंतु माझा मोठा मुलगा सुमित मुळे आजचा दिवस पाहता आला हे सांगताना ते भाऊक झाले होते. देवाने मला जे काही दिले ते भरभरुन दिल्याचे सांगितले.

याप्रसंगी अभियंता व्ही. एस. पाटील, ग्रामविस्तार अधिकारी सुनिल पाटील, राजेंद्र पाटील, सौ. दिपाली देवरे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना आठवणींना उजाळा दिला. बापाच्या प्रेमाखातर मुलगा सुमित ने ‘हो मी बाप पाहिला..’ ही कविता सादर करत मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला की, समाजात अनेक माणसं तू काय कमावले ? असा प्रश्न इतरांना विचारतात. पण.. माझे त्यावर एकच उत्तर आहे की, मी माझा बाप कमावला.. तीच माझी खरी संपत्ती मानतो. यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. कार्यक्रमासाठी ताराचंद पाटील, अशोक पवार, प्रकाश  पवार, संजय सोनवणे, चिंधू बाविस्कर, अरुण सूर्यवंशी, दिव्यचक्र न्यूज चे संपादक संजय सूर्यवंशी पाटबंधारे विभागातील कर्मचारी, आप्तेष्ट नातेवाईक, ग्रामस्थ, मित्र परिवार आदी उपस्थित होते. उपस्थितांनी विजय कापडे यांना सेवानिवृत्ती नंतरच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!