कु. जिया शाह व कु. पियुषा जाधव विद्यार्थीनी ‘साई रत्न’ पुरस्काराच्या मानकरी

अमळनेर : येथील साई इंग्लिश ॲकेडमी कोचिंग क्लासेस तर्फे दरवर्षी इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा ‘साई रत्न’ पुरस्कार देण्यात येतो. नुकत्याच रविवार, दि.२४ रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात वेगवेगळ्या स्पर्धेतील ११६ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड.कौस्तुभ पाटील उपस्थित होते. सोबत प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिकचे सह आयुक्त (वित्त) कपिल पवार, तसेच पारोळा न्यायालयाच्या सरकारी वकील सौ. प्रतिभा मगर, साई इंग्लिश ॲकेडमीचे कार्यकारी संचालक भैय्यासाहेब मगर होते.

यंदाच्या या ‘साई रत्न’ पुरस्कार साठी कु. जिया शाह व कु. पियुषा जाधव या विद्यार्थीनी मानकरी ठरल्या. मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. कु. जिया व कु. पियूषा हे हुशार व होतकरू असून सुरुवातीपासूनच साई इंग्लिश ॲकेडमीचे नियमित विद्यार्थी आहेत. पॅनल द्वारा मुलाखत घेऊन ‘साई रत्न’ निवडणारा साई इंग्लिश ॲकेडमी हा एकमेव क्लास असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे साई इंग्लिश ॲकेडमीचे संचालक-भैय्यासाहेब मगर यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी, पालक, ॲकेडमीतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!