प.पू. महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांचे शुभहस्ते सोमवारी ( दि.२७ मे ) रोजी प्रकाशभाई पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण

अमळनेेर तालुक्यात रोजगार, शिक्षण, शेती विषयाला प्राधान्य देत जनसेवा करण्याचा माझा संकल्प : प्रकाशभाई पाटील

अमळनेर : तालुक्यातील झाडी येथील मुळ रहिवासी तथा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजरात एटीएसमधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर. पाटील यांच्या अमळनेर येथील धुळे रोडवरील शिवांश बिझनेस हब येथे जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प. पू. महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांचे शुभहस्ते उद्या सोमवार, दिनांक २७ मे २०२४ रोजी सकाळी १०.४८ वाजता जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होईल.

नोकरीतून सेवानिवृत्तीनंतर प्रकाशभाई पाटील यांनी अमळनेर तालुक्यात विविध लोकोपयोगी कामे करत लोकसेवेसाठी आपले उर्वरित आयुष्य सार्थकी लावण्याचे ठरविले आहे. अमळनेेर तालुक्यात रोजगार, शिक्षण, शेती विषयाला प्राधान्य देत जनसेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी काल दि.२४ में रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

श्री प्रकाशभाई म्हणाले की,.. १) जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी रुग्णांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत असून गरजू रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा होईल. २) बेरोजगार हातांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी गुजरात मधील मित्र परिवाराच्या मदतीने लहान लहान उद्योग भागीदारीत सुरु करु. लवकरच एक उद्योग कार्यान्वित होईल त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री, जागा आदी बाबतीत नियोजन केले आहे. यामुळे तालुक्यातील किमान ३५० ते ४०० बेरोजगार तरुणांना दोन शिफ्टमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील १५४ गावांतील प्रत्येकी दोन गरजू तरुणांना पात्रतेनुसार रोजगार देण्यात येईल साहजिकच सर्वांना न्याय दिला जाईल यावर स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे. ३) पुढील काळात शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी बाहेरील देशात स्वतंत्र टीम संशोधन करीत असून कमी पाण्यात दीड महिन्यांत ३.५ फूट वाढ होणारी विशिष्ट झाडे लाऊन त्या झाडाची पाने प्रती टन २० हजार पेक्षा अधिक दराने विक्री साठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. पण.. ते झाड कसले ? हा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर वेळ आल्यावर ते स्पष्ट होईल असे सांगितले. ४) जनतेशी सतत संपर्क व्हावा यासाठी धुळे रोडवरील शिवांश बिझनेस हब येथे सोमवारी (दि.२७ में) जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करीत असून २४ तास सेवा देण्याचा प्रयत्न असेल.

विधानसभा निवडणुकीची ही नांदी तर नाही ना ? जनसेवा आताच व अमळनेर तालुक्यातच कां ? असे प्रश्न काही पत्रकारांनी केले असता, निवडणुकी बाबत अजून तसा कोणताही विचार ठरलेला नाही. अमळनेेर तालुक्यातील झाडी गाव ही माझी जन्मभूमी तर सात्री गावची सासुरवाडी असल्याने निवृत्तीनंतर अमळनेेर तालुक्यात रोजगार, शिक्षण, शेती विषयाला प्राधान्य देत जनसेवा करण्याचा संकल्प केला आहे. अमळनेेर तालुक्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या ओळखीचा, मित्र परिवार, उद्योजक यांच्या मदतीने आणखी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. आधी करुन दाखवायचे… मग जनताच ठरवेल त्यानंतर तसा निर्णय घेतला जाईल असे प्रकाशभाई यांनी सांगितले. सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशभाई आर. पाटील समस्त युवा मंच व मित्र परिवार यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!