अमळनेर : येथील द्वारका नगर परिसरातील रहिवासी सुनील चुडामण करंदीकर यांचे काल रविवार, दिनांक २६ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ५२ वर्षांचे होते. पोलीस कर्मचारी अनिल करंदीकर यांचे ते बंधू होत. गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपले योगदान दिले आहे. आपल्या अनुभवाने पत्रकार घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. आज दिनांक २७ मे रोजी सकाळी १० वाजता द्वारका नगर, पिंपळे रोड, अमळनेर येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!