पातोंडा : ‘नको रोग.. हवा योग’ या म्हणीला तसा अर्थ आहे. आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. ज्यामुळे अनेक फायदे होतात. नियमित योगासन केल्याने आपण अधिक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतो. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते हे सर्वश्रुत आहे. याचा भाग म्हणून अनेक जण नियमित योगा करतात. दिनांक २१ जून योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. योगा दिनाच्या निमित्ताने विविध संस्था, शाळा आदी ठिकाणी योगा दिवस पाळण्यात येतो. ग्रामीण भागात देखील याचा अनुभव येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमळनेर तालुक्यातील खवशी येथे ग्रामपंचायत आवारात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आज योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योगा दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. नरेगा कक्षाचे A P O किशोर ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
खवशी गावालगतच्या अमृत सरोवर च्या ठिकाणी योगा दिवस साजरा करतांना रोजगार सेवक महेश कापडे यांनी नेतृत्व केले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक सौ. रीना पाटील, भगवानपुरी गोसावी, धनराज पवार, गुलाब देसले, महेश कापडे (रोजगार सेवक), रमेश देसले, प्रकाश सुर्यवंशी, आनंदा कापडे, नाना मराठे, बाळु कापडे, यशवंत शिरसाठ, दिनकर पवार, राकेश गोसावी, आशिष पानकर, खुशाल गोसावी, किशोर सूर्यवंशी, अरुण कोळी, गंगाराम सोनवणे, कृषी सखी सौ. ललिता सूर्यवंशी, अंगणवाडी मदतनीस सौ. मनिषा कापडे, सौ मेघा सैंदाणे, बचत गट CRP सौ. सुनिता सूर्यवंशी, शिपाई गुलाब वाघ, पाणी पुरवठा कर्मचारी अरुण वाघ आदी उपस्थित होते.