जीवनाचे मुल्य हे तुमचा पैसा, संपत्ती नसून तुमचे शरीर ही तुमच्या कुटुंबाची संपत्ती : रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा.

अमळनेर : जीवनाचे मुल्य हे तुमचा पैसा, संपत्ती नसून तुमचे शरीर हेच तुमच्या कुटुंबाची संपत्ती आहे म्हणून आरशात उभे राहून स्वतः एकच म्हणा.. I love you..! असा मौलिक विचार आचार्य गुरुभगवंत रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा यांनी येथील बन्सीलाल पॅलेस येथे नुकत्याच पार पडलेल्या रत्नप्रवाह प्रवचन मालेच्या समारोप प्रसंगी उपस्थितांना दिला. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल तर्फे आयोजित ‘मुलांचे भविष्य व पालकांची भूमिका’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रवचन प्रभाविक संवेगनिधींश्रीजी उपस्थित होत्या. बजरंगशेठ अग्रवाल व त्यांच्या परिवाराने गुरुभगवंताचा सन्मान केला. यानंतर प्रा. अशोक पवार संपादित रत्नप्रवाह प्रवचन मालेचा विशेषांक ‘साप्ताहिक रयत जगत’ चे प्रकाशन घेवरचंद कोठारी, प्रकाश शहा, बजरंग अग्रवाल, सरजू गोकलाणी, प्राचार्य ए.बी. जैन, राजू महाले, रविंद्रसिंग कॉलरा, डॉ. भरतसिंग पाटील, शरद सोनवणे, डॉ.अक्षय कुलकर्णी यांचे शुभ हस्ते करण्यात आले. साप्ताहिक रयत जगत’ चे बापूराव ठाकरे व सौ. पूनम ठाकरे यावेळी उपस्थित होते. अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांना विचार प्रेरक पुस्तके मोफत वाटप करण्यात आली.

मार्गदर्शन करताना रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. म्हणाले की, परिवार, मन, जीवन या तीन गोष्टीचे संरक्षण व्हावे हा माझा प्रयत्न आहे. मुलांचे जीवन वाचविण्यापूर्वी स्वतःचे जीवन स्वच्छ व सुंदर बनवा, स्वतःमध्ये बदल करा हाच रत्नप्रवाह प्रवचन मालेचा संदेश आहे. ‘आर्ट ऑफ पॅरेन्टिंग ‘ विषयावर बोलतांना त्यांनी मेसेज, मॅच्युरिटी, मॉरल, मॅनर्स, वेळ हे पाच मुद्दे लक्षात आणून दिले.
१) मेसेज : तुमच्या वर्तनातून चांगला मेसेज गेला पाहिजे. महात्मा गांधी म्हणत माझे जीवनच मेसेज आहे. व्यवसायात खोटे बोलू नका. आदर्श जीवन जगले पाहिजे. तुमचा मुलगा तुम्हांला आदर्श मानतो का ?
२) मॅच्युरिटी (परिपक्वता) : तुम्ही तुमच्या शरिरावर प्रेम करता का ? शरीर ही तुमची संपत्ती आहे. शरीर, मन, आत्मा सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. शरीर माझे आहे. मी काहीही करेल. चुकीची भूमिका नसावी. व्यसन करताना तुम्ही पत्नी, मुलांना विचारले होते का ? स्वतःवर प्रेम करा.
३) मॉरल (मनोधैर्य) : वडिलांचे मॉरल, प्रतिष्ठा ही मुलांसाठी प्रेरणा असते. जो मुलगा वडिलांसोबत बसू शकत नाही, त्यांच्यात कुठले आले मॉरल ? माता जिजाऊ नी लहान असताना छत्रपती शिवाजी राजांना ते बाळकडू देऊन राक्षसी अफजलखानाचा वध केल्याचे उदाहरण दिले.
३) मॅनर्स (संस्कार) : वडिलांनी नुसतंच प्रेम दिले पण.. संस्कार दिले नाही. तर.. काय होते ? याचा विचार करावा. मुलांना पैसा नको, प्रेम पाहिजे असते.
५) मिनिट : कम्युनिकेशन गॅप मुळे समाज व्यवस्था बिघडत चालली आहे. कुटुंबात एकमेकांना वेळ दिला पाहिजे. मित्रांमुळे मुले वाया जातात,

‘लव जिहाद’ ला विरोध करण्यापूर्वी.. मुलगी घरातून कां पळाली ? तसेच एखाद्या मुलाने/ मुलीने आत्महत्या का केली ? चोराने घरातील चोरी का केली ? व्यसनाधीनतेला जबाबदार कोण ? हा प्रश्न स्वतःला विचारणं जास्त गरजेचे आहे. याला बऱ्याच अंशी आपण स्वतःच जबाबदार असतो. जसे ऊसातील संपूर्ण रस शोषून त्याला कचऱ्यात फेकून दिले जाते तसे या पळून जाणाऱ्या व आत्महत्या करणाऱ्यांना लागू होते. हे सांगताना कुटुंब Family आणि मित्र Friends दोन्ही शब्दांतील अंतर समजावून सांगताना कुटुंबात प्रेम असते तर मित्रत्वात शेवट असतो असेही सांगितले. यातून वेळीच सावरण्यासाठी आपल्यातल्या विवेक जागा झाला पाहिजे. हा विवेक कसा, केव्हा , कोणासाठी हेही लक्षात घ्यायला हवे. यावेळी प्रचंड जन समुदाय उपस्थित होता.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!