साने गुरुजींच्या स्मृतीदिनी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापनेला १३८ वर्षे झालेने तालुक्यातील १३८ गावांत संवाद यात्रेचे नियोजन

अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मधील संपर्क कार्यालयात दिनांक ११ जून रोजी साने गुरुजींच्या स्मृतीदिनी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न संपन्न झाली. जनतेला काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे भारतीय जनतेची मागील 138 वर्षात केलेली वैचारिक जडणघडण यासह देश उभारणीत केलेले योगदान सांगण्यासाठी नव्या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांना तसेच समविचारी पक्षातील नेत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काही नी आपल्या मौलिक सूचना मार्गदर्शन केले. त्यात मा. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार, “मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी त झालेल्या मत विभाजन” या विषयावर बोलताना तालुकाध्यक्ष बी.के. सूर्यवंशी यांनी सांगितले की, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव व पारोळा येथे दोन मंत्री इतर चार ठिकाणी महायुतीचे आमदार, भाजपच्या अति दबावामुळे, कार्यरत झालेले होते. व त्यांनाही पुढे आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याने, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चार्ज केले. तसेच (महायुतीच्या) तुलनेने अमळनेर तालुक्यात, महाविकास आघाडी चे बूथ लेवल कार्यकर्ते पूर्ण सक्रिय नव्हते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावर झाला. त्यामुळे शेतकरी समस्या, महागाई, बेरोजगारी, पक्ष फोडाफोडी, ईडी असले ठळक मुद्दे देखील अमळनेर तालुक्यात मतदारांचे मन वळवू शकले नाहीत. त्यासाठी आगामी काळात बूथ लेवल कार्यकर्ते वाढविणे, सक्रिय करणे व त्यासाठीचे वेळापत्रक तयार असल्याचे सांगितले.

जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी अमळनेर तालुक्याच्या मतदाना च्या आकडेवारीचे स्टॅटिस्टिक समजावून सांगितले. बूथ लेवल कार्यकर्त्यांना काम करण्याचे आवाहन केले. शेवटी जिल्हा महिला अध्यक्ष, सौ. सुलोचना वाघ यांनी कार्यकर्त्यांना मनापासून व गुणात्मक काम करण्याचे अर्जव केले. त्याशिवाय पक्ष संघटना बांधणी शक्य नाही, याबाबत उदाहरणे पटवून दिले. युवक तालुका अध्यक्ष कौस्तुभ पाटील यांनी आभार मानले.

संपर्क कार्यालयाचेही झाले उद्घाटन…

साने गुरुजी अमळनेर शहरात शेतकरी काम करी कष्टकरी यांचे प्रतिनिधी म्हणूनही चळवळ उभी करीत राहिले विद्यार्थ्यांना लिहिते वाचते बोलते केले त्यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून संदीप घोरपडे यांच्या संपर्क कार्यालयाचेही उद्घाटन झाले. यावेळी “बिन पैशाची निवडणूक” या विषयावर तालुक्यात ७५ गावात सभा घेतल्याचे सांगितले. १९८५ पासून स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाला आज १३८ वर्ष पूर्ण झालेने आम्ही १३८ गावांना सभा, भेटी देऊन, बूथ लेवलचे तरुण कार्यकर्ते वाढवू. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुक लढणार्‍यानी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. नाट्यगृहात याच ठिकाणी गौरी सुत प्रतिष्ठान यांचे कडून तालुक्यातील महिला आबाला वृद्धांना ज्या योजना आहेत त्यांची सविस्तर माहिती यासोबतच तरुणांना जिल्हा राज्य अथवा देशपातळीवरील विविध ठिकाणी नोकरीच्या संधी बाबत माहिती देत तरुणाईला योग्य दिशेला जाण्यासाठी मार्गदर्शन केले. मध्यंतरीच्या काळात संदीप घोरपडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटना संबंधी उहापोह करताना, बापूसाहेब शांताराम पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अविनाश पाटील, अमळनेर शहराचे माजी शहराध्यक्ष लोटन चौधरी यांनी संदीप घोरपडे यांना भरपूर संपर्क वाढवून, येत्या विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याचे आशिर्वाद दिलेत.

श्री संदीप घोरपडे यांच्या ‘अमळनेर पुन्हा विकले जाणार नाही.. आमदारच विकत घ्या.. फक्त दहा रुपयात..’ या थीमचे अनेकांनी दहा रुपये देऊन स्वागत केले. या दहा रुपयातून आपल्या मताचे मोल कायम लक्षात राहील. याकामी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले.

कार्यक्रमास हरी भिका वाणी, गजेंद्र साळुंखे, पी. वाय. पाटील, तुषार संदानशिव, ईघन पाटील, आर. पी. चौधरी सर, रोहिदास सुखा पाटील, श्रीराम आनंदा पाटील, कन्हैयालाल कापडे, बन्सीलाल भागवत, संभाजी देशमुख, रामकृष्ण पाटील, शरद पाटील, भीमसेन पाटील, प्रमोद पाटील, जयवंत पवार, भास्कर बोरसे, गुणवंत पाटील, पांडुरंग पाटील, सुनील पवार, अमित पवार, पुनीलाल पाटील, उत्तम पाटील, सय्यद तेली, राजू भाट, दिलीप भाऊसाहेब, आर.बी. पाटील. आनंदा धनगर, गौरव देशमुख, प्रकाश निकम आदी कार्यकर्त हजर होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!