कांतीलालजी पहाडे यांचे वृद्धापकाळाने निधन

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील प्रताप शेठ नगर मधील रहिवासी कांतीलालजी हिरालालजी पहाडे यांचे आज मंगळवार, दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात दोन मुले, सूना, मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. दि अमळनेर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे कर्मचारी संजय पहाडे यांचे ते वडील होत.
त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. आज दुपारी चार वाजेपर्यंत अंतिम दर्शन होईल व नंतर वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्यात येणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!