
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
धुळे : तालुक्यातील बोरविहीर येथील मूळ रहिवासी तथा चाळीसगाव तालुक्यातील देवळी स्थित स्व. पंडीत भिवसन सोनवणे यांचे काल बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, तीन मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक दिपक पाटील व राजेंद्र पाटील यांचे ते वडील होत. उद्या गुरुवारी दिनांक ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता देवळी ता.चाळीसगाव येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. गंधमुक्त व उत्तरकार्य ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता देवळी येथे होणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !