अमळनेर सोनार समाज बांधवांतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : संगमनेर तालुक्यातील वडगांव पान येथील १३ वर्षीय इ.६ वीत शिकणाऱ्या कु. ईश्वरी संजय डहाळे या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्यंत भ्याडपणे ॲसिड हल्ल्या केल्याची तीव्र संतापजनक व दूर्दैवी घटना घडली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. सदर घटनेचा अमळनेर तालुक्यातील सर्व सोनार समाज बांधवांनी जाहीर निषेध करत ईश्वरी डहाळे वर हल्ला करणाऱ्या आरोपीस कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी तसेच पिडीतेला तात्काळ योग्य ती वैद्यकीय मदत व शासकीय सहाय्य द्यावे या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी साहेब, अमळनेर यांना सर्व समाज बांधव आणि भगिनींच्या वतीने नुकतेच देण्यात आले.
यावेळी सर्वश्री डॉ.राजेंद्र नीतूकडे, हेमंत पवार, दिलीप कुळथे, संजय मुंडके, योगेश पांडव, चिंतामण चित्ते, अविनाश पांडव, राजाराम कुळथे, गिरीश सराफ, मनोहर दहिवाळ, निलेश नागोरे, योगेश खोरे, तुषार कुळथे, कुलदीप मुंडके, प्रवीण मुंडके, अनिल विंचुरकर, अविनाश चित्ते, दिलीप मुंडके, पंकज पवार, हेमांशू पांडव, डॉ. दिलीप श्रीमावळे, सुनील विंचुरकर, निलेश देवपूरकर, नंदकुमार वाघ, सुरेश दहिवाळ, किरण सोनार, शिरीष डहाळे, पिंटू भामरे, विजय भामरे, दिपक पवार, भोमेश नागोरे, मंजित नागोरे, सौ. कुमुद नितूकडे, सौ. माधुरी कुळथे, सौ. मोहिनी नागोरे, सौ. शुभांगी नागोरे, सौ. योगिता डहाळे, सौ. हर्षदा कुळथे, श्रीमती अनिता नितूकडे, ममता पोतदार व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.