अमळनेरात बीडीएस मार्केटिंग कंपनी आणि युवा मंच तर्फे शेकडो मुलांच्या घेतल्या मुलाखती
अमळनेर : येथील प्रकाश भाई पाटील युवा मंच आणि बीडीएस मार्केटिंग कंपनीतर्फे अमळनेर मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी तसेच नागरिकांना रोजगाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावागावात प्रकाशभाई पाटील युवा मंच तर्फे माहिती पत्रकाच्या माध्यमातून बेरोजगार तरुण, तरुणी, महिला आणि नागरिकांपर्यंत माहिती पुरविण्यात आली आहे. बीडीएस मार्केटिंग कंपनी तर्फे ऑनलाईन फॉर्मसाठी www.prakashbhaipatil.com या वेबसाईटवर फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन फॉर्म हा आपल्या मोबाईल वरून भरण्यात येणार असून ज्या कुणाकडे मोबाईल नसेल तर त्यांनी श्री प्रकाशभाई पाटील युवा मंच, अमळनेर यांच्या संपर्क कार्यालय, तळमजला, शिवांस बिझनेस हब, धुळे रोड, अमळनेर येथे फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत.
बीडीएस मार्केटिंग कंपनी आणि युवा मंच तर्फे दिनांक २६ व २८ जून २०२४ रोजी शेकडो मुलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रकाशभाई पाटील यांचेसह बीडीएस कंपनीचे विविध पदाधिकारी यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी काही उमेदवारांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या. यात, अमळनेेर येथे विप्रो कंपनी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या रोजगाराची संधी उपलब्ध नाही. त्यातही फक्त कंत्राटदारांकडून काही काळापुरता रोजगार उपलब्ध होतो कालांतराने घरी थांबावे लागते. काही उमेदवारांनी तर कंपनी खरच आहे का ? खरच आम्हाला रोजगार दिला जाणार आहे का? असे प्रश्न केल्यावर तुम्ही असा प्रश्न का करताय ? अशी विचारणा प्रकाशभाई केली. यावर तरुणांनी उत्तर दिले की, बरेच राजकारणी लोकांनी बेरोजगार तरुणांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत कोणीही रोजगार दिला नाही म्हणून शंका व्यक्त केली. यावर प्रकाशभाई यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही आपल्या कंपनीत काम करताना दिसणार आहात असे आश्वासित केले. प्रकाशभाई युवा मंच तर्फे आपणांस कायमस्वरूपी रोजगार दिला जाणार असून प्रत्येक कामगारांसाठी पाच लाखापर्यंत इन्शुरन्सही उपलब्ध होणार असल्याची ग्वाही दिली.
आपल्या परिसरात रोजगार उपलब्ध होत असल्याने त्यातून कुटुंबाला व स्वत: च्या शैक्षणिक कामात आर्थिक मदतही होणार आहे. दोन दिवसात शेकडो गरजू उमेदवारांनी मुलाखती देऊन आनंद व्यक्त केला. याप्रसंगी प्रकाशभाई पाटील, सामाजिक कार्यकर्ता सुरेश पाटील मा. सरपंच सुंदरपट्टी, प्रविण देशमुख, शामकांत पाटील मा. सरपंच गोवर्धन बोरगाव, अमित ललवाणी, हर्षल देशमुख, राजेंद्र पाटील, रामेश्वर आदी पदाधिकारी उपस्थित होते.