‘दिल्लीचेही तख्त राखतो.. महाराष्ट्र माझा’ : सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन

प्रागतिक समविचारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीत केले उपस्थितांना मार्गदर्शन

राजकारण हे बदलत असते.. भाजप आता दोन कुबड्यांच्या आधारे उभा

अमळनेर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी जो दबाव या देशावर होता.. जो अंधार दाटला होता, तो दबाव व अंधार कमी व्हायला २०२४ च्या निवडणुकीमध्ये सुरुवात झालेली आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत येऊन पंतप्रधान पदी जरी मोदीच झाले असले तरी भाजप आता दोन कुबड्यांच्या आधारे उभा आहे. यामुळे ‘दिल्लीचेही तख्त राखतो.. महाराष्ट्र माझा’ असे म्हणायला हरकत नाही. लोकशाहीत आपोआप काहीच घडत नसते.. राजकारण हे बदलत असते. यामुळे अवाढव्य कामाकडे पाहून घाबरू नका.. थोडं थोडं करायला सुरुवात करू या, असे विचार सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन यांनी व्यक्त केले. अमळनेर येथे साने गुरुजी विद्यालयाच्या एस. एम. गोरे सभागृहात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक आणि पुढे येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र प्रागतिक समविचारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक दिनांक २३ जून रोजी पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.

श्रीमती उल्का महाजन पुढे म्हणाल्या की, आपण साने गुरुजींच्या कर्मभूमीत आहोत. साने गुरुजी असं नेतृत्व होतं की, ज्यांनी सांस्कृतिक क्षेत्रापासून राजकीय क्षेत्रापर्यंत या सर्व बाबींचा विचार केला आणि आपल्या कृतीत ते आणलं ते आता पुढे नेण्याची गरज आहे. पहिल्यांदा पंतप्रधान पदावरील व्यक्ती सर्वात कमी फरकाने जिंकलेली ही पहिली निवडणूक ठरली. साहजिकच मोदीं ची जादू, मोदी है तो मुनकीन है.., आयेंगे तो मोदीही.., ४०० पारचा नारा या सगळ्या घोषणांतील हवा निघून गेली हे लोकसभा निकालातून स्पष्ट झाले. या निकालांमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी हा परिणाम घडवून आणताना काहीतरी ठोस निर्णय घेऊन योग्य दिशेने काम केलंय. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जो जो वाटा उचलून या निवडणुकीमध्ये काम केलंय त्यांचं सगळ्यांचं काम निश्चितच अभिनंदनास पात्र असल्याचे सांगून सगळ्यांचे अभिनंदनही केले.

जन चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं हे अभियान…

महाराष्ट्र भरातल्या अनेक कार्यकर्त्यांचे संमेलन विद्रोहाच्या भूमीत पंढरपूर मध्ये झालं.. तेव्हा संकल्प घेण्यात आला आणि कामाला वेगवेगळ्या प्रकारे सुरुवात झाली. यात्रा संपल्यानंतर निर्णय घेतला की, आपण अभियान म्हणून याला आकार दिला पाहिजे. आजच्या काळात ‘भारत जोडो’ हा संदेश महत्त्वाचा आहे म्हणून तेच नाव ठेवण्यात आलं. पण या अभियानाचा काँग्रेसशी वा कोणत्याच पक्षाशी काहीही संबंध नाही. सन ८० च्या दशकामध्ये सुरु केलेली ही यात्रा होती तेव्हापासूनचा तो संदेश आहे. तो संदेश आम्हाला महत्त्वाचा वाटला म्हणून तेच नाव घेण्यात आले. जन चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं हे अभियान आहे. भारत जोडो अभियान म्हणून एक निश्चित नियोजनबद्ध प्रक्रिया राबवण्यात आली.

प्रास्ताविक करताना अविनाश पाटील म्हणाले की, पुरोगामी परिवर्तनवादी संविधानाची पाठराखण करणाऱ्या लोकांनी यात्रेला पाठिंबा देत स्वागत केलं. काही लोक सहभागी झाले तर काही लोकांनी आपली मते, भूमिका, मागण्या त्या निमित्ताने यात्रेमध्ये राहुल गांधींसोबत मांडायचा प्रयत्न केला. यात्रा पूर्ण झाल्यानंतर यात्रेच्या सोबत जे जे लोक जोडले गेले होते त्या लोकांनी मिळून भारत जोडो अभियान नावाचा राष्ट्रीय पातळीवरचा एक समन्वय मंच उभा केला आहे. जनसंघटनांच्या कार्यकर्ते पदाधिकारी नेत्यांनी राज्या राज्यांमध्ये पण यंत्रणा निर्माण केली आणि त्या मार्फत लोकसभा निवडणुकी च्या आधी ठरवून नियोजनबद्ध काम असं करण्याचा प्रयत्न केला गेला. होऊ घातलेली विधानसभा निवडणुक लक्षात घेता खेडोपाडी प्रचार गरजेचा असून या काळात आपण काय करावे, पक्ष बांधणी कशी करावी, आपले विचार जनतेसमोर कसे मांडता येतील याबद्दल विचार मांडले

देशांमध्ये जी एक अघोषित आणीबाणी त्याचं प्रतिकार करण्याचं एक निमित्त घडलं. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर एका विचारधारेचे ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ विचारवंत एम.एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येचे पडसाद उमटले. त्यावेळेला शासनाने दिलेले पुरस्कार हे परत देण्याचा एक मोठ्या प्रमाणात आवाज उठवला गेला. अशा साहित्यिक चिंतक अभ्यासक लोकांच्या पुरस्कार वापसीच्या तो असंतोष संघटित समन्वयित करण्याचं काम दक्षिणायन या मंचाच्या मार्फत डॉक्टर गणेश यांच्या नेतृत्वात केलं गेलं आणि देशभरातले साहित्यिक, कलावंत, अभिव्यक्ती करणारे सात कलाकार या लोकांना एकत्र करून ‘दक्षिणाय’ म्हणून एक मंच उभा राहिला. त्याच्या मार्फत देखील मोदी आणि भाजपच्या विचारधारेला विरोध करण्याच्या भूमिकेतून या लोकसभा निवडणुकीच्या आधी काही प्रयत्न झाला. दबावाच्या विरोधात निर्भयपणे बाळासाहेब ठाकरेंच्या त्यावेळच्या भूमिका लक्षात घेत पुढे नेण्यासाठी मुंबईमध्ये शिवसेनेने प्रतिकार केला. त्याचा पुढाकार त्यावेळेला ज्येष्ठ पत्रकार आपल्या चळवळीचे साथीदार असणारे निखिल वागळे यांनी केलं होतं पण आता नरेंद्र मोदींच्या या दडपशाहीला आणीबाणीच्या व्यवस्थेला विरोध करण्याच्या भूमिकेतन तसे वातावरण निर्माण करण्याची भूमिका घेऊन त्याच्यासाठीच जनसंवाद करण्यासाठी त्यामुळे अशा पद्धतीने एक वातावरण निर्मिती करुन समाज मनाचा संभाव्य अंदाज घेऊन संवाद करायचा प्रयत्न झाला.

उत्तर महाराष्ट्र संदर्भातला आढावा मांडताना प्रा. अशोक पवार सर, जयसिंग वाघ, खलील देशमुख, भाऊसाहेब देशमुख, दर्शना पवार, बन्सीलाल भागवत गुरुजी, सतीश भाऊ, मगन भाऊसाहेब, नितीन बागुल, रचना अडसुळे, रामदासभाऊ, चुनिलाल पाटील, दिलवरसिंग पाडवी, रंजनाताई आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पाटील यांनी केले तर आभार संदीप घोरपडे यांनी मानले.

मी अमळनेर विधानसभेचा इच्छूक उमेदवार : संदीप घोरपडे

कार्यक्रमाचे आयोजक संदीप घोरपडे यांनी अमळनेर विधानसभा क्षेत्रातील समस्यांचा उहापोह केला. सामाजिक संघटना, राजकीय संघटना, बुथ, गाव, तालुका पातळी जिल्हा स्तरावर नियोजन झाले पाहिजे. राज्यस्तरावर भारत जोडो अभियानांतर्गत इतरांना सहभागी करुन युवा, शेतकरी, महिला यांच्यासमोर आपले पक्षाचे विचार मांडले पाहिजेत. विधानसभेत वैचारिक भूमिका घेऊन मांडणी करणारे आमदार जायला हवेत लोकशाही च्या चारही स्तंभांसह पाचवा सामाजिक चळवळींचा स्तंभ जिवंत रहायला हवा असा सामान्य व्यक्ती आमदार म्हणून विधानसभेत दिसावा. अशी अपेक्षा व्यक्त केली.

अमळनेर विधानसभेला पुन्हा- पुन्हा मतदार विकले जातात असा कलंक लागला आहे. भविष्यात असे घडू नये यासाठी “मला मतदारांनी पाच वर्षासाठी दहा रुपयात आमदार म्हणून विकत घ्या” असे सांगत स्वत: विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार केला आहे. काँग्रेसमध्ये माझी ३२ वर्षापासून ची कारकीर्द असून माझा जनसंपर्क आणि माझ्या शाळेचे केलेलं काम, नगरपालिकेतील केलेलं काम, सामाजिक काम या गोष्टींचा विचार करत असताना महाविकास आघाडी ने याबाबत सर्वांगीण विचार करुन मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी हाकच जणू यावेळी पक्षाला दिली. मात्र.. येत्या काळात काय होईल ? ते वेळ ठरवेल.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!