अमळनेर : संसद रत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्री शक्तीचा अर्थातच कर्तृत्ववान महिलांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. अमळनेर येथील ढेकू रोडवरील राजमुद्रा फाऊंडेशन च्या फोर्ट येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार बी. एस. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या कुसुम आक्का तसेच नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ उपस्थित होते.
अमळनेर शहरात शैक्षणिक, पर्यावरण, स्वच्छता अशा अनेक समस्या जाणून घेऊन महानगरपालिकेला गुजरात ट्रस्टच्या ज्या महिला मदत करीत असतात अशा २५ महिलांचा सत्कार करण्यात आला. सोबतच शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करुन ग्रामीण व शहरी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनांच्या नियुक्ती करण्यात आल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल पारोळा तालुका अध्यक्ष म्हणून रावसाहेब पर्वत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दयाराम पाटील यांनी हे नियुक्तीपत्र दिले.