अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) अठरा गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

विद्यार्थ्यांना उपविभागीय दंडाधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप

अमळनेर : येथील क्लासेस संघटनेने (PTA) अठरा गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना सोमवार,दि.८ जुलै रोजी एक सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील अठरा गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलली. यावेळी क्लासेस संघटना(PTA) अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, विनोद जाधव, किरण माळी, राकेश बडगुजर, सुरश्री वैद्य, सुधीर टाकणे, शर्मिला बडगुजर, सोनल जोशी, धिरज पवार, स्वाती पाटील, परेश गुरव, सुनिल पाटील उपस्थित होते.

सदरील विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे. सर्वच विद्यार्थी अमळनेर येथील शाळा,महाविद्यालय येथे शिक्षण घेतात. कल्याणी भोई (आठवी), गौरव चव्हाण (आठवी), नितू भोई (सहावी), आदित्य तायडे (आठवी), तनिष्का तायडे (अकरावी), उत्कर्षा उपासनी (बारावी), लोकेश पाटील (नववी), रोहिणी पाटील दहावी), दिव्या पाटील (नववी), रोहित कोळी (नववी), यश पाटील (दहावी), दुर्गेश दिघे (नववी), हिमेश पाटील (नववी), कु.इशिका कालोसे (नववी ), मनीष पाटील (बारावी), कु.सुप्रिया पाटील (नववी), रितेश पाटील (सातवी), कुणाल पाटील (आठवी) या विद्यार्थ्यांना एका वर्षभरासाठी फ्री कोचिंग देण्यात येईल. सदरील विद्यार्थ्यांकडून क्लास फी चे कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही व वर्षभर सर्वांना शैक्षणिक साहित्य देण्यात येईल अशी अधिकृत घोषणा उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग, अमळनेर यांच्या कार्यालयात क्लासेस संघटना (PTA) चे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर यांनी केली. यावेळी मा.महादेव खेडकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. PTA संघटने मार्फत सातत्याने होत असलेल्या समाज उपयोगी कार्याची नोंद शासन दरबारी व्हावी अशी विनंती यावेळी संघटने मार्फत प्रांत महोदयांना करण्यात आली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!