अमळनेर येथे आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच चा जाहीर पाठिंबा

अमळनेर : आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजाचा जातीचे प्रमाण मिळणे संदर्भात गेल्या १५ जुलैपासून बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा सुरु आहे. सदर मोर्चास श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच, अमळनेर यांनी लेखी जाहीर पाठिंबा दिला आहे. सदरील पाठिंब्याचे पत्र बेमुदत उपोषणकर्ते यांना नुकतेच देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याकडे आदिवासी कोळी समाजासोबत वेळोवेळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात तपासण्या व सुनावण्या देखील झालेल्या आहेत. तरी देखील जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने सर्व आदिवासी कोळी समाजाने हा बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा काढला असून त्यास श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांनी लेखी स्वरूपाचा जाहीर पाठिंबा दिलेला आहे. याप्रसंगी मोर्चाचे सर्व पदाधिकारीसह युवा मंच चे अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव किरण पाटील सर, प्रवीण देशमुख सामाजिक कार्यकर्ता, हर्षल देशमुख, नरेंद्र पाटील रणाईचे, अमित ललवानी ,अमळनेर आणि गुलाब आगळे आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!