राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत खानदेश शिक्षण मंडळाचा विशेष वाटा : खासदार स्मिताताई वाघ

जी. एस. हायस्कूल च्या ८६ व्या वर्धापनदिनी गौरवोद्गार

अमळनेर : जी व्यक्ती कष्ट, मेहनत व जिद्दीने पुढे जाते त्याला यश हमखास मिळत असते. जो समोर ध्येय ठरवून शिकतो व ध्येय गाठतो त्याला कुठल्याच आरक्षणाची गरज पडत नाही. आयुष्यात ध्येय ठरविल्याने यशाचा मार्ग सोपा होतो. राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत खानदेश शिक्षण मंडळाचा विशेष वाटा राहिला आहे असे मत जळगाव लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केले. खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूल च्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकत्याच आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी होते. अध्यक्षांचा परिचय देवयानी भावसार यांनी करून दिला. आर.जे.पाटील यांनी अहवाल वाचन केले.

खासदार स्मिताताई पुढे म्हणाल्या की, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. शाळेला विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा तसेच अटल लॅब च्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. अनिल शिंदे यांनी मराठी शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून शिक्षक भरती हा महत्वाचा प्रश्न आहे. शासनाने तो प्रश्न सोडविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी यांनी शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी केक कापण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय ध्वजाचे ध्वजारोहण करुन शाळेचा वर्धापन दिनाचा लोगो फुग्यांच्या सहाय्याने आकाशात सोडण्यात आला.

व्यासपीठावर संस्थेचे कार्योपाध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल, अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, संचालक योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, डॉ.अनिल शिंदे, शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, संस्थेचे देणगीदार विवेकानंद भांडारकर, अभिजित भांडारकर, निलेश भांडारकर, अनिल वैद्य, संस्थेचे सचिव डॉ. ए. बी. जैन, सहसचिव प्रा. धीरज वैष्णव, माजी संचालक प्रवीण जैन, शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम, लायन्स क्लब चे विनोद अग्रवाल, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुखदेव माळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. सी. मोराणकर, व्ही. व्ही. कुलकर्णी, द्रो. रा. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, कैलास पाटील, स्वप्ना शिसोदे, सुनंदा चौधरी, ए. डी. भदाणे, एस. आर. शिंगाने, सी. एस. सोनजे, एस. पी. वाघ, के. पी. पाटील उपस्थित होते. यावेळी एसएससी परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्था तसेच इतर देणगीदार यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना दप्तर, गणवेश तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. ए. पाटील यांनी केले तर आभार एस.पी.वाघ यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!