खवशी येथे जि. प. शाळेतील चिमुकल्यांनी नवभारत साक्षरता वारीतून केली जनजागृती

ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी… म्हणत पंढरी दुमदुमली

अमळनेर : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील खवशी येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात साक्षरता वारी काढून साक्षरते विषयी जनजागृती करण्यात आली. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी वारकरी वेशभूषा केलेली होती. चिमुकल्या मुलांनी गळ्यात वारकऱ्यांच्या माळा, हातात टाळ, मृदंग घेऊन आपली छाप टाकली होती. काही बालिकांनी आपल्या डोक्यावर तुळस, वृक्ष रोपटे घेऊन वारीत सहभागी झालेल्या होत्या. सोबत असलेल्या पालखीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा व ग्रंथ ठेवून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय पदाधिकारी, विद्यार्थ्यांनी पालखीचे पूजन केले. चिमुकल्यांनी टाळ मृदंग वाजवत अभंग, भजन, शैक्षणिक साक्षरते चे गीत गायन केले. बालिकांनी फुगड्या खेळत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

त्यानंतर शाळेतून ही साक्षरता वारी जनजागृती साठी गावात निघाली. साक्षरता गीत गाऊन नवभारत साक्षरता व पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली. काही विद्यार्थ्यांचे हाती जनजागृती संदेश देणारे फलक होते. यावेळी मुख्याध्यापक हिम्मत चौधरी, उपशिक्षक दिलीप कंखरे, पंकज शिसोदे, अजय कोळी, पूनम पवार, शालेय समितीचे अध्यक्ष राहुल मराठे, शालेय समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या साक्षरता वारीचे गावकऱ्यांनी कौतुक केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!