पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म वर्षानिमित्त धरणगाव येथे समाज जागृती प्रबोधन मेळावा संपन्न

धरणगाव : धनगर समाज, मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्या वतीने धरणगाव येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी समाज जागृती प्रबोधन मेळावा नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी महापौर सदाशिव राव ढेकळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मौर्य क्रांती संघाचे राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत व जिल्हाध्यक्ष रविंद्र लाळगे होते. सुरुवातीला पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संतोष भडांगे यांनी केले. तर मान्यवरांचे स्वागत शहरप्रमुख पप्पू कंखरे यांनी केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलतांना सदाशिव राव ढेकळे यांनी रोजगार मेळावा साठी समाजाच्या घराघरात ‌पोहचले पाहिजे असे सांगितले. समाजाची प्रगती करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन बन्सीलाल भागवत म्हणाले. तर समाज हितासाठी समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने योगदान देऊन अल्पसा प्रयत्न करावा असे आवाहन रविंद्र लाळगे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन मौर्य क्रांती संघ शहरप्रमुख पप्पू कंखरे, मौर्य क्रांती संघ धरणगाव तालुकाध्यक्ष निंबाजी कंखरे व मौर्य क्रांती संघ जिल्हा सरचिटणीस संतोष भडांगे यांनी केले होते. याप्रसंगी समाजसेवक नानासाहेब बोरसे, गोपीचंद सिरसाठ, दत्तात्रय गुरुजी, तेले सर, ॲडव्होकेट चंद्रकांत पारखे यांनी ही समाज प्रबोधनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार निंबा कंखरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक हजर होते. कार्यक्रमासाठी डी.एस.धनगर, आर. सी. भालेराव, वसंत भालेराव, सुरेश भालेराव, ज्ञानेश्वर रमेश पाटील, व्यंकट किसन धनगर, विजय रमेश धनगर, रमेश देव शिरसाठ, बळीराम धनगर, वाल्मिक बच्छाव, अमोल धनगर, गोपाल सोनवणे, समाधान धनगर, राजेंद्र बिऱ्हाडे, देविदास सोनवणे, महादू न्हाळदे, सम्राट सोनवणे, बापू धनगर, राजेंद्र धनगर, संजय धामोळे, योगराज धनगर, गोपाल धनगर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!