संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न; अखंड पारायण साठी चांगला प्रतिसाद

अमळनेर : सालाबादाप्रमाणे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. यादिवशी देशभर मोठ्या श्रद्धेने गुरुजनांचा सन्मान केला जातो. गुरुपौर्णिमा चे औचित्य साधत अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन आज करण्यात आले होते. सकाळी पाद्यपूजन, अभिषेक करुन सामूहिक पारायण, सार्वजनिक आरती करण्यात आली. महिला वारीच्या प्रमुख ज्योतीताई पवार यांच्या संकल्पनेतून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अखंड पारायण ग्रुपला चांगला प्रतिसाद मिळाला.. संत गजानन महाराज मंदिरात सामूहिक अखंड पारायण करण्यात आले. मारवडहून अमळनेरला आलेल्या संत गजानन पायीवारीतील १२० भक्तांचे कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.आर.बी.पवार, ज्योतीताई पवार, अशोक भावे, नितीन भावे, सेवेकरी रघूनाथ पाटील, विश्वास पाटील, मोहीत पवार, संजय पाटकरी, परेश पाटील, विजू येवले, सनी पाटील, विवेक पाटील, देवेंद्र चौधरी, मनिष पाटील, रूपेश पवार, पंकज येवले यांचेसह सर्व गजानन भक्तांनी परिश्रम घेतले. यावेळी संत गजानन परिवारातील सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

योगदान देणाऱ्या भक्तगणांचा झाला सन्मान…
संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष आर. बी. पवार व महिलावारी प्रमुख ज्योतीताई पवार व गजानन भक्तांच्या हस्ते संत गजानन परिवारासाठी योगदान देणाऱ्या भक्तगणासाठी गजानन महाराजांची भव्य मोठी प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यात, राजेंद्र बागुल, भाऊसाहेब ए. बी.पाटील, एम. यु. शिंपी, प्रतिभा नेरकर ताई, इंदिराताई येवले, नितीन पाटील कोळप्रिपी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारवड संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य एल. जे. चौधरी सर यांनी केले.



Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!