
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी विनायक बुधा शिरसाठ (आप्पासाहेब) याचें आज सोमवार, दिनांक २२ जुलै रोजी रात्री १.०५ वाजता वृद्धापकाळाने दुखद निधन झाले. मृत्यू समयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवार दिनांक २२ जुलै रोजी दुपारी तीन वाजता राहत्या घरुन निघेल. खवशी येथील तीर्थराज शिरसाठ व योगराज शिरसाठ यांचे ते वडील होत. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो हीच दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !