अमळनेर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार प्रा. अशोक पवार ..?

गरीब व्यक्तींकडून ‘भूकबळी’ परिस्थिती वर प्रकाशित केलेल्या पत्रकातून माहिती उघड

अमळनेर : येथील गांधलीपुरा भागातील अल्लामा फजले हक़ खैराबादी ग्रंथालयात काल दि.३ ऑगस्ट रोजी ‘भूकबळी’ परिस्थिती वर एक पत्रक प्रकाशन करण्यात आले. हे पत्रक कशाबद्दल व कोणी काढले ? याची कोणालाच माहिती नसल्याने उत्सुकता सर्वांनाच होती. पत्रक प्रकाशन झाल्यानंतर पत्रक पाहिले तर या पत्रकावर गरिबांचा हितचिंतक व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमळनेर विधानसभेचे इच्छुक उमेदवार प्रा.अशोक पवार यांचे नाव छापलेले दिसले हे तितकेच सत्य आहे. यामुळे अमळनेर विधानसभेचे इच्छुक उमेदवारांच्या यादीत एक ने वाढ झाली असे म्हणता येईल.

मै गरीब हूं किस्मत का, इसका मुझे गम नही । अरे दौलत नही तो क्या हुआ, इज्जत मेरी कम नही ।। अशी शायरी पत्रकावर असून अमळनेर विधानसभा मतदारसंघातील कुपोषणाची दयनीय स्थिती दर्शविली आहे. मतदार संघातील अमळनेर तालुक्यात तीव्र कुपोषित ५५ मध्यम २२६ तर पारोळा तालुक्यात तीव्र कुपोषित ८९ मध्यम कुपोषित ३५८ अशी आकडेवारी आहे. प्रत्यक्ष परिस्थिती भयानक असल्याने “भकास जीवनाचा विकास कधी ? कुपोषित गरिबांना घास कधी ? अशी हाक दिली आहे. कवी विश्वनाथ कोनाळे यांच्या राजकारण व भ्रष्टाचार वर आधारित ओळी पत्रकावर नमूद केल्या आहेत.

यासंदर्भात प्रा. अशोक पवार म्हणाले की, सभोवताली जे काय चाललय ते होणारे प्रकार किती दिवस बघत बसायचे ? ते असेच चालणार का ? यावर विचार करण्याची खरी गरज आहे. सर्व पुरोगामी संघटना, वैचारिक मंडळी एकत्र आल्याने इंडिया आघाडी कडे मत परिवर्तन होत आहे. यापुढे पुरोगामी विचारांची माणसं एकत्र आली पाहिजे व सत्तेतील राजकारण्यांना प्रश्न विचारले पाहिजेत असा सूर निघाला. यावेळी पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!