‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ची अमळनेर तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे यांचे नाव घोषित

अमळनेर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर येथे पत्रकारांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश प्रतापराव काटे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. याचवेळी साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी अजय भामरे यांना साप्ताहिक विंग चे अमळनेेर तालुकाध्यक्ष घोषित केले. बैठकीत नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष उमेश काटे, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, साप्ताहिक विंग चे तालुकाध्यक्ष अजय भामरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया चे जिल्हा संघटक जयेश काटे यांचेसह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी उर्वरित तालुका कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. अन्य कार्यकारिणीत.., उपाध्यक्ष – गौतम बिऱ्हाडे, सचिव – जितेंद्र पाटील कोषाध्यक्ष – रवींद्र मोरे, सहसचिव – ईश्वर महाजन, प्रसिद्धीप्रमुख – दिनेश पालवे, सल्लागार म्हणून विवेक अहिरराव, उमेश धनराळे, धनंजय सोनार तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून जयंत वानखेडे, बापूराव ठाकरे, मिलिंद पाटील, विनोद कदम, राहुल बहिरम, रजनीकांत पाटील, रविंद्र बोरसे, उमाकांत ठाकूर, कमलेश वानखेडे, मधुसूदन विसावे, सुखदेव ठाकूर, शरद कुलकर्णी, भरत पाटील, प्रकाश जैन, बी. एल. पाटील, रमण भदाणे, दिनेश नाईक, विशाल मैराळे व प्रसाद जोशी यांचा समावेश आहे.

दरम्यान डिंगबर महाले म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडिया ही सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून असलेली संघटना आहे. एका गावापासून सुरू झालेली ही संघटना आज थेट ४१ देशात गेली आहे. राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक एक लाख ७६ हजार सदस्य असलेली ही संघटना आहे. या संघटनेचे नाव कसे उज्वल होईल, यादृष्टीने प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. पत्रकारांनी आपली पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. उमेश काटे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, देशातील क्रमांक एक ची पत्रकार संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी माझी नियुक्ती होणे हा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याचे पावित्र जोपासण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्वाना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय संघटक अशोक वानखेडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, गुजरात प्रदेश अध्यक्ष जिग्नेश जोशी, उर्दु विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती नदवी, प्रदेश महिला संघटक यास्मिन शेख, गुजरातचे प्रदेश उपाध्यक्ष जिग्नेश जोशी, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, आदीनी अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!