शहर व तालुका स्तरावर विविध शिबीरांचे आयोजन करत महसूल पंधरवाड़ा २०२४ चे झाले आयोजन

अमळनेर : शहर व तालुका स्तरावर विविध शिबीरांचे काल दिनांक ३ ऑगस्ट रोजी महसूल पंधरवाड़ा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कामासाठी उपविभागीय अधिकारी महादेवजी खेड़कर तसेच तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनीही मार्गदर्शन केले. सोबत महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. उपस्थितांनी शासनाच्या विविध योजना समजावून घेतल्या.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमळनेर येथे मुख्यमंत्री तीर्थ यात्रा दर्शन योजना शिबीर

उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमळनेर येथे महसूल पंधरवाड़ा २०२४ अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बाबत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी महादेवजी खेड़कर तसेच तहसीलदार रूपेशकुमार सुराणा होते. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी सर्व उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिक संघाच्या सभासद यांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजने बाबत मार्गदर्शन केले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी शंकांचे निरसन करून घेतले. त्यानंतर सदर योजनेचे अर्ज भरून घेतले. याप्रसंगी अमळनेेर शहरातील पुज्य सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, सचिव एस. एम. पाटील यांचेसह पुज्य सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे सर्व सभासद हजर होते.

ढेकुसिम व आदर्श हायस्कूल, अमळगाव येथे नवीन मतदार नोंदणी शिबीर

यादी भाग क्रमांक ११८ व ११९ बीएलओ ढेकुसिम फाॅर्म नमुना नं. ६, ७, ८ भरताना नवीन मतदार नोंदणी, महीला मतदार विशेष नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता.

अमळगाव मंडळ भागातील अमळगाव सजा येथील आदर्श हायस्कूल, अमळगाव या ठिकाणी सकाळी १० वाजता महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सर्व मंडळ भागातील बीएलओ तसेच तलाठी यांचा सहभाग दिसून आला. शिबीरात एकूण ८३ नवीन महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी अमळगाव भागचे मंडळ अधिकारी पी. एस. पाटील व भागातील तलाठी पराग पाटील, तलाठी स्वप्नील कुलकर्णी, तलाठी वाल्मीक पाटील, तलाठी जितेंद्र पाटील, तलाठी परवर तड़वी तसेच अमळगाव आणि दोधवद चे कोतवाल, सरपंच अमळगाव, भागातील सर्व बीएलओ आणि आदर्श हायस्कूल अमळगाव चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

पीक पाहणी संदर्भात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर कर्मचारी…

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीक पाहणे संदर्भात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन माहिती देण्यात आली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!