
अमळनेर : व्हाईस ऑफ मीडियातर्फे शिर्डी येथे दिनांक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४ रोजी पत्रकारांसाठी राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे, प्रदेशाध्यक्ष अनिलजी म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्रजी दोरकर आदी वरिष्ठांच्या मान्यतेने पत्रकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी राज्य शिखर अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राज्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा. सांस्कृतिक कार्यक्रमात गीत गायन कराओके, नृत्य, एकपात्री प्रयोग, नाटीका, मिमिक्री, विडंबन काव्य, संगीत वादन असे विविध कलागुण सादर करण्याची संधी पत्रकारांना मिळणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी येत्या दि.१० ऑगस्ट २०२४ पर्यंत आपले संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, संपूर्ण पत्ता याप्रमाणे आपली नावे द्यावीत. १० ऑगस्ट २०२४ नंतर आलेल्या नावांना प्राधान्य दिले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी केलेली नसल्यास कार्यक्रमात ऐनवेळी कोणालाही कलागुण सादर करण्याची संधी मिळणार नाही यामुळे अगोदरच आपली नावे द्यावीत, असे आवाहन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समिती अध्यक्ष रमाकांत पाटील (जिल्हाध्यक्ष -व्हाईस ऑफ मीडिया, नंदुरबार) यांनी केले आहे. नाव नोंदणी साठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२४३८३९८ वर संपर्क साधावा.