
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल येथे ४९ महाराष्ट्र बटालियन चे नवनियुक्त कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित राय यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात एन.सी.सी. चे महत्व सांगितले तसेच सैन्य भरती तसेच इतर सैनिकी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी एन.सी.सी. हे कसे उपयुक्त आहे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानिक, बटालियन चे मुख्य लिपिक सुनील सोनार उपस्थित होते. भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी शाळेतील एन.सी.सी. विभागाची पाहणी केली. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने, सी.एस. सोनजे, एन.सी.सी. शिक्षक एस. ए. बनछोडे, सी. आर. पाटील तसेच शिक्षक उपस्थित होते.