
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयातील विविध विद्या शाखेतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग संलग्नित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या ३९ व्या राज्य पात्रता चाचणी सेट परीक्षेत भरीव यश संपादन केले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेकरिता सेट परीक्षा ०७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल ५ ऑगस्ट २०२४ रोजी घोषीत करण्यात आला.
या परीक्षेत आकाश चौधरी (पदार्थविज्ञान), विवेक पाटील (रसायनशास्त्र), सागर सैंदाणे (मराठी), विशाल खैरनार (राज्यशास्त्र), जैसल जेठवा (वाणिज्य व व्यवस्थापन), स्वप्निल चौधरी (गणित), भूषण पाटील (संख्याशास्त्र) यांनी यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, प्राचार्य डॉ.अरुण जैन, सह चिटणीस डॉ.धिरज वैष्णव, उप प्राचार्य प्रा.पराग पाटील, डॉ.विजय तुंटे, डॉ.कल्पना पाटील, डॉ.व्ही.बी.मांटे, डॉ.अमित पाटील, डॉ.योगेश तोरवणे, डॉ.मुकेश भोळे, कुलसचिव राकेश निळे,भटू चौधरी, देवेंद्र कांबळे, अजय साटोटे, योगेश बोरसे, कमलाकर पाटील, धनराज मोरे, संदेश शर्मा, उमाकांत ठाकूर आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.