स्पर्धा परीक्षा म्हणजे मोठी संधी व चक्रव्यूह : हिमांशू टेंभेकर

अमळनेर : करिअर कौन्सिलिंग सेंटर, प्रताप कॉलेज (स्वायत्त) व पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वारी UPSC’ या उपक्रम अंतर्गत संघ लोक सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यासाठी हिमांशू टेंभेकर यांचे मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शनपर व्याख्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात १० ऑगस्ट रोजी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन होते. सोबत विचारमंचावर खा. शि. मंडळाचे सह सचिव डॉ. धिरज वैष्णव, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे समन्वयक डॉ. मुकेश भोळे, पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक विजयसिंग पवार, करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ विजय तुंटे तुंटे उपस्थित होते. प्रास्ताविकातून विजयसिंग पवार यांनी UPSC ची वारी व स्पर्धा परीक्षा नेमके काय आहे ? या बद्दलची विस्तृत माहिती दिली. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.विजय साळुंखे यांनी करून दिला. यानंतर अतिथींचे स्वागत केले.
मार्गदर्शन करताना हिमांशू टेंभेकर यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी सदैव सकारात्मक राहिले पाहिजे, तथागत बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वयं प्रकाशित झाले पाहिजे. अपयशाने कधीही खचून न जाता कठीण परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. चहू बाजूंकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. आपणास जर स्पर्धा परीक्षेच्या मैदानात उतरायचे असेल तर पूर्ण तयारीनिशी उतरणे आवश्यक आहे. त्यासाठी खूप वाचन गरजेचे आहे. तसेच समाज माध्यमा पासून लांब राहणे करिअरच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यामुळे सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी वैचारिक शहाणपण अंगी येते. संघर्षा शिवाय जीवनात शौर्य नाही. स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी १) अभ्यासक्रम पाहणे २) या पूर्वीचे प्रश्न अभ्यासणे ३) चालू घडामोडी या तीन बाबी वर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी शॉट नोट्स काढणे आवश्यक आहे. जाता जाता.. ‘प्रभू और न कोई वरदान चाहीए, बस अभी युद्ध के लिए मैदान चाहीए’ असे सांगत पूर्ण विराम दिला.
याप्रसंगी डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. नितीन पाटील, डॉ. माधव भुसनर, डॉ. हेमंत पवार, प्रा. नितेश कोचे, डॉ. बालाजी कांबळे, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. प्रदीप पवार, प्रा. दिलीप तडवी आदी प्राध्यापक उपस्थित होते. व्याख्यान यशस्वीतेसाठी डॉ. राखी घरटे, प्रा. दिलीप तडवी, दिलीप शिरसाठ, पंकज भदाणे, पराग पाटील, दिपक चौधरी, अक्षय सोनार, हिमांशू गोसावी, अनिकेत अहिरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विजय तुंटे यांनी केले तर आभार विजयसिंग पवार यांनी मानले.
