मांडळ येथे स्व. आबासाहेब किसन पाटील प्रतिष्ठान तर्फे ४०० वृक्षांचे रोपण

अमळनेर: तालुक्यातील मांडळ येथे स्व. आबासाहेब किसन पाटील प्रतिष्ठान मार्फत दिनांक १० रोजी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला. या उपक्रमात गावात सुमारे ४०० रोपे लावून हिरवळीची चादर पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात मा. जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील याचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, नर्मदा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संचालक डॉ. अनिल शिंदे, धनगर दला पाटील, जिभाऊ सुभाष पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या व गावकऱ्यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि गावचे माजी सरपंच मनोहर पाटील यांनी सर्व ग्रामस्थांना समोर प्रतिष्ठान मार्फत ४०० वृक्षांचे रोपण करणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली. गावातील नागरिकांना वृक्षारोपणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल पाटील यांनी केले. कार्यक्रमात सरपंच मीनल कोळी, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका दादासो हिम्मतराव पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. सुनिल चोरडिया, हिरालाल सोनवणे, भानुदास पाटील, कैलाश पाटील, सखाराम आबा, रवींद्र पाटील, प्रवीण पाटील, रामचंद्र पाटील, समाधान पाटील, शुभम सोनवणे, स्वप्नील पाटील, जगदीश पाटील, चेतन पाटील, गबा भाऊसाहेब, आरीफ दादा, योगेश वानखेडे, चि. आकाश सह ग्रामस्थ उपस्थित होते. स्व. आबा साहेब किसन पाटील प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे मांडळ गावात हिरवळीचे प्रमाण वाढणार असून पर्यावरण, जतन , संरक्षणासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवल्याची भावना समस्त गावकऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!