महाराणा प्रताप विद्यालयात विद्यार्थ्यांना डॉ. संजय भोकरडोळे लिखित ‘आठवणी स्वातंत्र्य सैनिकांच्या’ पुस्तकांची अनोखी भेट

दहावीच्या माजी विद्यार्थी ग्रुपचा उपक्रम

जळगाव : शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात यंदा दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ.संजय भोकरडोळे लिखित ‘आठवणी स्वातंत्र्यसैनिकांच्या’ हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. याच विद्यालयातून सन १९८६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थी ग्रुपतर्फे पुस्तकांची ही अनोखी भेट देण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप बाबुराव सोनवणे यांनी डॉ.भोकरडोळे व नाना राजपूत यांच्या हस्ते ही भेट स्वीकारली.

मुख्याध्यापक सोनवणे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची आठवण आणि शाळेसाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवणे ही अतिशय अभिनंदनीय बाब असून शाळेमध्ये मुलांवर करण्यात आलेले संस्कार हे त्यांना आयुष्यभर कामास येतात, असेही त्यांनी सांगितले. शाळेतल्या शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन आणि दाखविलेला विश्वास यामुळे व्यवहारिक आयुष्यात त्याचा खूप फायदा झाला आणि आत्मविश्वास वाढला, अशी प्रतिक्रिया डॉ.भोकरडोळे आणि राजपूत यांनी व्यक्त केली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!